कापसाच्या बीजोत्पादनासाठी पुढे या : डॉ. दत्तप्रसाद वासकर

come to front for Cotton Seeding: Dr. Duttprasad Vaskar
come to front for Cotton Seeding: Dr. Duttprasad Vaskar

बदनापूर जि. जालना : ‘‘गुलाबी बोंड अळीच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन तंत्राचा अवलंब करावा लागेल. लागवडीच्या खर्चात कपात करून उत्पन्न वाढविणे आवश्‍यक आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत विकसित केलेले एनएचएच-२५० व ७१५ हे वाण आता बी. टी.(बीजी-दोन) स्वरूपात उपलब्ध होणार आहे. राज्यातील शेतकऱ्यांनी कापसाच्या बीजोत्पादनासाठी पुढे यावे,’’ असे प्रतिपादन विद्यापीठाचे संचालक संशोधन डॉ. दत्तप्रसाद वासकर यांनी केले. 

बदनापूर येथील कृषी विज्ञान केंद्रात शनिवारी (ता.१४) कापूस फरदड निर्मूलन कार्यशाळेत अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून बदनापूर कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गिरीधारी वाघमारे, कीटकशास्त्रज्ञ डॉ. संजीव बंटेवाड, सहयोगी संचालक संशोधन डॉ. सूर्यकांत पवार, कापूस विशेषज्ञ डॉ. खिंजर बेग, मोसंबी संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. संजय पाटील, कार्यक्रम समन्वयक डॉ. सचिन सोमवंशी, डॉ. दीपक पाटील यांची उपस्थिती होती. 

डॉ. बेग म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांना बीजोत्पादनासाठी योग्य ते प्रशिक्षण दिले जाईल. गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी फरदड घेऊच नये. एनएचएच-२५० व ७१५ या बी. टी. वाणाचे प्रात्यक्षिक बदनापूर येथील इच्छुक शेतकऱ्यांच्या शेतावर घेतले जाईल.’’ 

डॉ. बंटेवाड यांनी कपाशीवरील गुलाबी बोंड अळीचे ‘एकात्मिक व्यवस्थापन व ट्रायकोकार्ड वापर’ यावर मार्गदर्शन केले. डॉ. पवार यांनी कापूस पिकाचे लागवड तंत्रज्ञान शेतकऱ्यांना सांगितले. डॉ. संजय पाटील, डॉ. संजीव बंटेवाड, डॉ. दीपक पाटील, डॉ. संजय पाटील, डॉ. प्रफुल्ल घंटे, डॉ. चंद्रकांत पाटील, प्रा. प्रशांत सोनटक्‍के, प्रा. शरद गोसावी आदींनी कार्यशाळेत भाग घेतला. 

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com