शेतमाल प्रक्रिया उद्योगासाठी गटशेती हा उत्तम पर्याय ः डॉ. शोभने

परभणी : ‘‘शेतमाल प्रक्रिया उद्योगाच्या यशस्वीतेसाठी गटशेती हा उत्तम पर्याय आहे,’’ असे प्रतिपादन बेंगलोर येथील फुड सेफ्टी अॅमेझॉनचे वरिष्ठ व्यवस्थापक शशिन शोभने यांनी केले.
For the commodity processing industry Group farming is the best option: Dr. Shobhane
For the commodity processing industry Group farming is the best option: Dr. Shobhane

परभणी : ‘‘शेतमाल प्रक्रिया उद्योगाच्या यशस्वीतेसाठी गटशेती हा उत्तम पर्याय आहे,’’ असे प्रतिपादन बेंगलोर येथील फुड सेफ्टी अॅमेझॉनचे वरिष्ठ व्यवस्थापक शशिन शोभने यांनी केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्प (नाहेप), नवी दिल्ली येथील अखिल भारतीय अन्नप्रक्रिया उद्योजक संघटना आणि मुंबई येथील फार्म टु फोर्क सोल्युशन यांच्यातर्फे ‘डिजीटल तंत्रज्ञानाद्वारे कृषी प्रक्रिया उद्योग : उद्योजकांच्या यशोगाथा’ या विषयावर एक आठवड्याचे ऑनलाईन वेबिनारमध्‍ये बुधवारी (ता.२९) शोभने बोलत होते. यात बेंगलोर येथील नामधारी सिड्स प्रा. लिमिटेडचे नाशिकस्थित महाव्यवस्थापक व संचालक  सुनिल अवारी, परभणी येथील विश्वास अॅग्रो फुड प्रॉडक्ट्सचे संचालक युसुफ ईनामदार, बेंगलोर येथील क्लाऊंड टेल इंडियाचे प्रॉडक्ट कम्प्लायंस व्यवस्थपक सचिन अचिंतलवार आदी सहभागी झाले.

अवारी म्‍हणाले, ‘‘शेती ही पांरपरिक पध्दतीने न करता नवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन केल्यास निश्चितपणे मोठ्या प्रमाणावर नफा मिळू शकतो. बाजारात मागणी असणाऱ्या पिकांची लागवड करावी. नाशिक पॅटर्न प्रमाणे गट शेती मोठ्या प्रमाणावर यशस्‍वी झाली आहे. उत्पादित झालेल्या शेतीमालाची काढणी पश्चात आधुनिक तंत्रज्ञान जसे तापमान नियोजन, पुरवठा साखळी, प्लास्टिक क्रेटचा वापर, प्रतवारी, पॅकिंग, प्रिकुलींग इत्यादी नाविन्य पूर्ण पध्दतींचा अवलंब करुन बाजारात दिड पटीने जास्त नफा मिळू शकतो.’’ 

अचिंतलवार यांनी ‘अॅमेझॉन तथा फ्लिपकार्ट व जिओ मार्ट’ सारख्या विविध अॅपद्वारे माल ग्राहकांपर्यंत कसा पोहचतो, याबाबत माहिती दिली. शेतमालप्रक्रिया उद्योगामध्ये केवळ प्रक्रिया व मुल्यवर्धन एवढेच पर्याय नसून या पेक्षाही वेगळ्या प्रकारे उत्पादित माल ग्राहकापर्यंत पोहचवून मोठ्या प्रमाणावर नफा मिळवू शकतो, असे त्यांनी सांगितले. प्रास्ताविक प्रा. डॉ. राजेश क्षीरसागर यांनी केले. प्रा. श्‍याम गरुड यांनी आभार मानले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com