नुकसानग्रस्तांना भरपाई मिळावी ः सुनील केदार

पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी शनिवारी (ता. १५) केली. यावेळी लोकप्रतिनिधी व शासकीय यंत्रणेने समन्वयात काम करून आपत्तीग्रस्तांना मदत करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
नुकसानग्रस्तांना भरपाई मिळावी ः सुनील केदार
Compensation should be given to the victims: Sunil Kedar

नागपूर : अवकाळी पाऊस व गारपीट अशा नैसर्गिक आपत्तीमुळे नागपूर जिल्ह्यातील अनेक गावांना तडाखा बसला आहे. या भागाची पाहणी पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी शनिवारी (ता. १५) केली. यावेळी लोकप्रतिनिधी व शासकीय यंत्रणेने समन्वयात काम करून आपत्तीग्रस्तांना मदत करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

या वेळी त्यांनी नागपूर तालुक्यातील बोखारा गावास प्रथम भेट देऊन नैसर्गिक आपत्तीत मृत पावलेल्या हेमंत रोशन निवते यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यांचे आस्थापूर्वक विचारपूस करून सांत्वन केले. मृत मुलगा दुग्ध वाटपाचे काम करत होता. त्यामुळे त्याच्या कुटुंबीयांस पशुसंवर्धन विभागाच्या योजनेतून गाय व म्हसी देण्यासोबत सानुग्रह अनुदान म्हणून चार लाख रुपये देण्याची घोषणा पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी केली. 

शासकीय योजनेतून गुरांचा गोठा मंजूर करण्याच्या सूचना त्यांनी गटविकास अधिकारी व तहसीलदार यांनी दिल्या. त्यासोबत पोलिस विभागाने तत्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. राज्य शासनातर्फे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले आहे. या दौऱ्यात त्यांनी नागपूर तालुक्यातील बोखारा, गुमथळा, बैलवाडा, कामठी तालुक्यातील गुमथी, लोणखैरी, सावनेर तालुक्यातील दहेगाव(रं), पारशिवणी तालुक्यातील  इटगांव, भागीमहारी, रामटेक तालुक्यातील जमुनीया, टुयापार, घोटी, फुलझरी या गावातील अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे हानी झालेल्या शेताची पाहणी केली. जिल्ह्यात जवळपास ७ हजार ४३१ हेक्टर क्षेत्रांमध्ये कापूस, गहू, हरभरा, तूर, उन्हाळी भुईमूग, भाजीपाला व संत्रा व टोमॅटो या फळपिकांचे नुकसान झाले आहे. ८ हजार ३३४ खातेधारकांना या अवकाळी पावसाचा फटका बसला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. 

या दौऱ्यात त्यांचेसमवेत जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुमित्रा कुंभारे, जिल्हा परिषदेचे कृषी सभापती तापेश्वर वैद्य, जिल्हा परिषद सदस्य कुंदा राऊत, प्रकाश खापरे, राजू कुसुबे, दुधाराम सव्वालाखे, शांता कुमरे, उपविभागीय अधिकारी इंदिरा चौधरी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मिलिंद शेंडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेश भोयर तसेच पंचायत समितीचे सभापती, सदस्य, अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.