प्रकल्प पूर्ण करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम ः पाटील

नांदेड : ‘‘जलसंपदा विभागाच्या नांदेड जिल्ह्यातील विविध प्रकल्पांच्या समस्या मार्गी लावून प्रकल्प पूर्ण करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम तयार करा,’’ अशा सूचना जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी दिल्या.
To complete the project Time bound program: Patil
To complete the project Time bound program: Patil

नांदेड : ‘‘जलसंपदा विभागाच्या नांदेड जिल्ह्यातील विविध प्रकल्पांच्या समस्या मार्गी लावून प्रकल्प पूर्ण करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम तयार करा,’’ अशा सूचना जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी दिल्या. 

जलसंपदा विभागाच्या नांदेड जिल्ह्यातील विविध प्रकल्पासंदर्भात पालकमंत्री अशोक चव्हाण आणि पाटील यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बुधवारी (ता. ९) आढावा बैठक झाली. नांदेड जिल्ह्यातील जलसंपदा विभागाचे प्रलंबित विषय मार्गी लावण्यासाठी अशोक चव्हाण सातत्यपूर्ण पाठपुरावा करीत आहेत. त्यांच्या पाठपुराव्याला सकारात्मक प्रतिसाद देत पाटील यांनी मध्य गोदावरी खोऱ्यात पाणी उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे या उपलब्ध जलसाठ्यातून हाती घ्यावयाच्या विविध प्रकल्पांच्या अंमलबजावणी संदर्भात कालबद्ध कार्यक्रम आखून सर्व प्रकल्प कालमर्यादेत सुरू करण्याच्या सूचना पाटील यांनी दिल्या. 

नांदेड जिल्ह्यातील रेणापूर प्रकल्प, पिंपळढव साठवण तलाव, ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्पांच्या कालवा दुरुस्तीचे काम, पैनगंगा नदीवरील उच्च पातळी बंधाऱ्यांना प्रकल्पांचा भाग म्हणून मान्यता देणे, लेंडी प्रकल्पाच्या स्वेच्छा पुनर्वसनाचा शासन निर्णय निर्गमित करणे, बाभळी बंधारा गेटच्या संचलनाबाबत तेलंगणा राज्याशी चर्चा करणे व जलसंपदा विभागाच्या जागा शासकीय कामासाठी हस्तांतर करण्यासाठी मंजुरी देणे, अशा विविध कामांबाबत चर्चा झाली.  आमदार अमरनाथ राजूरकर, माधव जवळगावकर, श्यामसुंदर शिंदे, जलसंपदा विभागाचे सचिव विलास राजपूत आदी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com