परभणी, हिंगोलीत कॉंग्रेसची कृषी विधेयकांविरूध्द निदर्शने

परभणी : केंद्र सरकारने लोकशाही आणि संसदेचे नियम पायदळी तुडवून शेतकरी विरोधी कृषी विधेयके मंजूर करून घेतली.
Congress protests against the Agriculture Bill in Parbhani, Hingoli
Congress protests against the Agriculture Bill in Parbhani, Hingoli

परभणी : केंद्र सरकारने लोकशाही आणि संसदेचे नियम पायदळी तुडवून शेतकरी विरोधी कृषी विधेयके मंजूर करून घेतली. हा शेतकऱ्यांना उद्योगपतींचे गुलाम बनवण्याचा डाव आहे. काँग्रेस पक्षातर्फे केंद्र सरकारच्या या काळ्या कायद्यांविरुध्द, तसेच हे कायदे मागे घ्यावे, यासाठी परभणी आणि हिंगोली येथे शुक्रवारी (ता.२)  शेतकरी व कामगार बचाव दिन पाळत आंदोलने करण्यात आली.  

परभणी येथील बी. रघुनाथ सभागृहासमोर माजी कृषी राज्यमंत्री, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश वरपुडकर यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली.

यावेळी उपमहापौर भगवान वाघमारे, शहारध्यक्ष नदीम इनामदार आदीसह कार्यकर्ते सहभागी झाले होते. हिंगोली येथे कॉंग्रेसचे गुजरातचे प्रभारी खासदार राजीव सातव यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्ते मोठ्या संख्यने सहभागी  झाले होते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com