नगर जिल्ह्यात दहा हजार टन मुरघासनिर्मिती
नगर जिल्ह्यात दहा हजार टन मुरघासनिर्मिती

नगर जिल्ह्यात दहा हजार टन मुरघासनिर्मिती

नगर ः दुष्काळात चाराटंचाईवर मात करण्यासाठी मुरघास फायदेशीर ठरत आहे. त्याच अनुषंगाने जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून पाच हजार शेतकऱ्यांना प्रत्येकी दोन बॅगांनुसार दहा हजार बॅगा देण्याचे नियोजन केले आहे. त्यासाठी प्रशासन प्रति बॅंक पाचशे रुपये देणार असून, शेतकऱ्यांना प्रति बॅग शंभर रुपये लोकवाटा द्यावा लागणार आहे. 

नगर जिल्ह्यामध्ये यंदा दुष्काळाची तीव्रता आहे. त्यामुळे यंदा पिण्याच्या पाण्यासोबत सर्वाधिक टंचाई जनावरांच्या चाऱ्याची आहे. बहुतांश भागात खरिपात पिके आली नाहीत. तर रब्बीत पेरणीच झाली नाही. त्यामुळे गेल्या चार महिन्यांपासून लोकांची जनावरांच्या चाऱ्याची शोधाशोध सुरू आहे. यंदा पाणी उपलब्ध नाही. मात्र, धरण क्षेत्राच्या कार्यक्षेत्रात जेथे पाणी उपलब्ध आहे, तेथे शेतकऱ्यांनी अन्य पिकांपेक्षा चाऱ्यासारखी पिके घ्यावीत, असे अावाहन प्रशासनाने केले होते. त्यानुसार कृषी विभागाने चारा उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना बियाणेही दिली आहेत. 

दुष्काळात चारा व्यवस्थापन करताना मुरघास हा दुष्काळात फायदेशीर ठरत असल्याचे जिल्ह्यामधील अनेक शेतकऱ्यांनी दाखवून दिले आहे. मुरघास केला तर तो बऱ्याच दिवस वापरता येतो. जनावरेही त्याला खातात, शिवाय तो पोषक असतो हे कृषी विभागाने सातत्याने सांगितले आहे. त्यामुळे चारा उत्पादनासोबतच शेतकऱ्यांनी मुरघास तयार करावा. उत्पादित करावा यासाठी जिल्हा प्रशासनाने जिल्हा नियोजन समितीमधून पाच हजार शेतकऱ्यांना दहा हजार मुरघास बॅगा देण्याचे नियोजन केले आहे. यावर प्रशासन पन्नास लाख रुपये खर्च करणार असून, दहा लाख रुपये लोकसहभागातून मिळतील. ज्या भागात चाऱ्याचे उत्पादन घेतले जाते. सध्या ज्यांनी चारा उत्पादन घेतले अशा शेतकऱ्यांची लाभार्थी म्हणून निवड केली जाणार आहे, असे तंत्र अधिकारी सतीश सिरसाट यांनी सांगितले.

तालुकानिहाय लाभार्थी  नगर ः ३००, पारनेर ः ३००, पाथर्डी ः २००, कर्जत ः ३००, जामखेड ः २००, श्रीगोंदा ः ८००, श्रीरामपूर ः १५००, राहुरी ः १५००, नेवासा ः १५००, शेवगाव ः २००, संगमनेर ः १३००, कोपरगाव ः ८००, राहाता ः ८००, अकोले ः ३००.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com