पुणे जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोटक्षेत्रात संततधार

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे  : जिल्ह्याच्या पश्चिम भाग, घाटमाथ्यावर पावसाने दमदार हजेरी लावली आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरू आहे. पश्चिमेकडील तालुक्यांत पावसाच्या जोरदार सरी येत असल्या तरी, कोरडवाहू तालुक्यात मात्र हलक्या सरी सुरू आहेत. पाणलोट क्षेत्रातील नदी, नाले, ओढे वाहू लागल्याने धरणांमधील पाणीसाठ्यात वेगाने वाढ होत आहे. 

पश्चिम भागात असलेल्या मावळ, मुळशी, भोर, वेल्हा तालुक्यांमध्ये पावसाने चांगला जोर धरला आहे. वेल्हा येथे सर्वाधिक १४१, तर लोणावळा येथे १२० मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याचे कृषी विभागातर्फे सांगण्यात आले. जुन्नर, आंबेगाव, खेड या तालुक्यांत घाटमाथ्यावर चांगला पाऊस असला तरी, पूर्वेकडे पावसाचे प्रमाण कमी होत आहे. पूर्वेकडील सर्व कोरडवाहू पट्ट्या सरी मागून सरी येत असून, पावसाने जोर धरलेला नाही. पडलेल्या पावसावर जिल्ह्यात खरीप पेरणीला वेग आला आहे. 

विविध ठिकाणी पडलेला पाऊस (मिमी, स्रोत ः कृषी विभाग) : पौड ७८, घोटावडे ५०, माले ७६, मुठे ६८, पिरंगुट ६१, भोलावडे ७०, नसरापूर ६५, आंबवडे ४६, संगमनेर ४९, निगुडघर ९४, वडगाव मावळ ४४, तळेगाव ५८, काले ७६, कार्ला १२१, खडकाळा ८०, लोणावळा १२०, शिवणे ५५, वेल्हा १४१, पानशेत ५३, विंझर ७८, अंबवणे ५२, कुडे ५७, पाईट ४४, आंबेगाव ५३.

टेमघरमधील  पाणीसाठा उपयुक्त पातळीत पुणे शहर, हवेली, दौंड, इंदापूर तालुक्याला पिण्यासाठी आणि शेतीसाठी पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पात वेगाने पाणी जमा होण्यास सुरवात झाली आहे. पूर्णपणे कोरड्या पडलेल्या टेमघर धरण क्षेत्रात दमदार पाऊस पडत असल्याने पाणीसाठा उपयुक्त पातळीत आला आहे. चारही धरणांमध्ये गतवर्षीपेक्षा अधिक पाणीसाठा जमा झाला आहे. मंगळवारी (ता. २) चारही धरणांत मिळून ३.६७ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. गतवर्षी धरणांमध्ये ३.६५ टीएमसी पाणीसाठा होता. 

मंगळवारी (ता. २) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये धरण क्षेत्रात पडलेला पाऊस (मिलिमीटर) : वरसगाव ९६, पानशेत ९७, खडकवासला ५५, टेमघर १४०, पवना ९०, कासारसाई ४७, मुळशी १२०, कलमोडी ६६, चासकमान ४४, भामा आसखेड ३०, आंद्रा ७०, वडीवळे १२०, गुंजवणी १०७, भाटघर ४०, नीरा देवघर ८२, वीर ५, नाझरे ४, माणिकडोह ९, येडगाव ४, पिंपळगाव जोगा १४, वडज ४, डिंभे १६. 

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com