पाचशे एकरावर धने लागवडीचा प्रयोग 

मागील वीस ते पंचवीस वर्षांपासून एकच पीक घेतल्यामुळे पिकांना मर रोगाची लागण झाली होती.
coriander
coriander

नांदेड : मागील वीस ते पंचवीस वर्षांपासून एकच पीक घेतल्यामुळे पिकांना मर रोगाची लागण झाली होती. सततच्या पाणीवापरामुळे जमिनीतील बुरशीचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढू लागल्याने पारंपरिक पिकांना फाटा देण्याशिवाय शेतकऱ्यांना पर्यायच उरला नव्हता. त्यामुळे शहापूर, शेखापूर परिसरांतील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन मसालेजन्य पदार्थांमध्ये उपयोगी ठरणाऱ्या धने पिकाचे उत्पादन घेण्याचे ठरविले. त्यामुळे या वर्षी देलूर तालुक्यात प्रथमच पाचशे एकरांवर धने पीक बहरू लागले आहे. 

वारंवार तेच ते पीक घेतले गेल्याने दोन-तीन वर्षांपासून हरभरा व करडी पिकांना मर रोगाची लागण होत आहे. यामुळे उत्पादनावर मोठ्या प्रमाणात परिणाम होत होता. त्याच त्या पिकामुळे जमिनीत बुरशीचा प्रादुर्भाव वाढू लागला होता. यामुळे हरभरा पिकाला फाटा देत शहापूर येथील यालावार बंधूनी २२ एकरवर धने (कोथिंबीर) पिकाची लागवड करण्याचे ठरवले. यासाठी त्यांनी एकरी १४ किलो बियाणे वापरले. तीन वेळेस पाणी देऊन दोन कीटकनाशकांची फवारणी केली. सध्याला पीक पूर्णतः भरात आले असून २२ एकरावर आलेल्या पांढऱ्या फुलाने हा संपूर्ण परिसर सुगंधाने दरवळून गेला आहे.   ऑक्टोबरमध्ये लागवड केलेले धने पीक जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात काढणीला येईल. एकरी नऊ ते दहा क्विंटल उत्पादन या पिकातून होते. सध्याच्या बाजारभावाप्रमाणे प्रति क्विंटल सात ते आठ हजार रुपयांचा भाव या पिकांना येऊ शकतो. तसेच यावर प्रक्रिया करून धन्यापासून मसाल्याची पावडर बनविण्यासाठी प्रकल्प उभारण्याचा संकल्प केला आहे. तालुक्यातील विष्णू पाटील खांडेकर, पांडू पाटील, विठ्ठल पाटील, हनुमंतराव खांडेकर, नामदेवराव खांडेकर, बळवंतराव खांडेकर, अशोक खांडेकर, अशोक गवळे आदी शेतकऱ्यांनी ५०० एकरांवर धने पिकाची लागवड केली आहे.  प्रतिक्रिया पारंपरिक पिकांना फाटा देत धने शेतीकडे वळण्याचा प्रयत्न केला आहे. तालुक्यातील या वर्षीचे चांगले उत्पन्न लक्षात घेता धन्यापासून पावडर बनवण्यासाठी प्रकल्प या परिसरात उभारण्याचा प्रयत्न आम्ही शेतकरी मिळून करणार आहोत.  - विलास रेड्डी यालावार,  कोथिंबीर उत्पादक शेतकरी, शहापूर

देगलूर तालुक्यात फळपिकासोबतच शेतकऱ्यांनी पाचशे एकरांवर धने पिकाची लागवड केली आहे. पीक बदलातूर शेतकऱ्यांना निश्‍चितच चांगला फायदा होईल.  - शिवाजी शिंदे, तालुका कृषी अधिकारी, देगलूर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com