जगभरातील कोरोना रुग्ण अडीच कोटींवर; भारत तिसऱ्या क्रमांकावर

वॉशिंग्टन: जगभरात कोरोनाचा प्रसार सुरूच असून आत्तापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता अडीच कोटींवर गेली आहे. अमेरिकेतील जॉन हाफकिन्स विद्यापीठाने ही आकडेवारी जाहीर केली आहे.
जगभरातील कोरोना रुग्ण अडीच कोटींवर; भारत तिसऱ्या क्रमांकावर
जगभरातील कोरोना रुग्ण अडीच कोटींवर; भारत तिसऱ्या क्रमांकावर

वॉशिंग्टन : जगभरात कोरोनाचा प्रसार सुरूच असून आत्तापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता अडीच कोटींवर गेली आहे. अमेरिकेतील जॉन हाफकिन्स विद्यापीठाने ही आकडेवारी जाहीर केली आहे. जगभरात अमेरिकेत कोरोनाचे सर्वाधिक ६० लाख रुग्ण असून त्यानंतर ब्राझील (३८लाख) व भारताचा (३५लाख) क्रमांक लागतो. कोरोनामुळे अमेरिकेतच सर्वाधिक ८ लाख ४२ हजार मृत्यू झाले आहेत. कोरोनाच्या चाचण्यांना मर्यादा असल्याने प्रत्यक्षातील रुग्ण यापेक्षा कितीतरी पटीने अधिक असल्याचा अमेरिकेतील आपत्ती नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राचा दावा आहे. लक्षणे नसणाऱ्या किंवा सौम्य लक्षणे असणाऱ्या अनेक रुग्णांची नोंद झालेली नाही. त्यामुळेही कोरोनाचे प्रत्यक्षातील रुग्ण खूप अधिक असण्याची शक्यताही या केंद्राने वर्तविली आहे. चीनमधून उगम पावलेल्या कोरोना विषाणूने पाहतापाहता जग कवेत घेतले.

सर्वाधिक मृत्यूचे देश

  • १. अमेरिका : १, ८२,७७९
  • २. ब्राझील :  १,२०,२६२
  • ३.मेक्सिको : ६३,८१९ 
  • Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

    ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    www.agrowon.com