राज्यात ‘पणन’ची दहा हजार क्विंटल कापूस खरेदी

पणन महासंघाकडून शुक्रवार (ता.२७) पासून कापूस खरेदीस सुरुवात झाली. त्यानंतर सुमारे दहा हजार २२१ क्विंटल कापसाची खरेदी १६ केंद्रांच्या माध्यमातून झाली आहे.
राज्यात ‘पणन’ची दहा हजार क्विंटल कापूस खरेदी
राज्यात ‘पणन’ची दहा हजार क्विंटल कापूस खरेदी

नागपूर : राज्यात महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाकडून शुक्रवार (ता.२७) पासून कापूस खरेदीस सुरुवात झाली. त्यानंतर सुमारे दहा हजार २२१ क्विंटल कापसाची खरेदी १६ केंद्रांच्या माध्यमातून झाली आहे. ॲपच्या माध्यमातून नोंदणीचा पर्याय उपलब्ध करून देण्याचे पणन महासंघाकडून हंगामाकरिता प्रस्तावित होते. ही प्रक्रिया रखडल्याने कापूस खरेदीस देखील विलंब होत होता. त्यानंतर ॲप उपलब्ध करून देणे शक्य नसल्याचे कळाल्यानंतर अखेरीस शुक्रवार (ता.२७) पासून खरेदी सुरू करण्याचा निर्णय पणन महासंघाकडून घेण्यात आला. राज्यात या वेळी ३० केंद्र सुरू करण्याचे प्रस्तावित आहे. जास्तीत जास्त ही संख्या ३६ पर्यंत नेली जाणार आहे.  त्यापेक्षा अधिक केंद्र कोणत्याही परिस्थितीत सुरू केले जाणार नाहीत, असे यापूर्वीच पणन महासंघाकडून सांगण्यात आले आहे.  ३६ केंद्रांच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांचा कापूस खरेदी केला जाईल , असा दावाही केला जात आहे. त्याकरिता नियोजन केल्याची माहिती पणन महासंघाचे अध्यक्ष अनंतराव देशमुख यांनी दिली. दरम्यान, शुक्रवारपासून राज्यात कापूस खरेदी सुरू झाली त्यानंतर आजवर सुमारे दहा हजार २२२ क्विंटल कापूस खरेदी झाला आहे. सात झोनमधील १६ केंद्रांवर ४१४ शेतकऱ्यांकडून हा कापूस खरेदी करण्यात आला. वीस जिनिंगमध्ये ही खरेदी केली जात आहे. राज्यात पणनकडून झालेली कापसाची खरेदी

झोन केंद्र संख्या खरेदी (क्विंटल मध्ये)
नागपूर ४ केंद्र ७२८.२४ 
वणी १ केंद्र ५३५.५
यवतमाळ ३ केंद्र ३२६६.७५
अमरावती २ केंद्र ८६९.८
अकोला २ केंद्र ७३
औरंगाबाद २ केंद्र २६८७.७
नांदेड २ केंद्र २०६१.८

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com