`यंत्राद्वारे कपाशीच्या लागवडीने मजुरांच्या समस्येवर मात शक्य`

`यंत्राद्वारे कपाशीच्या लागवडीने मजुरांच्या समस्येवर मात शक्य`
`यंत्राद्वारे कपाशीच्या लागवडीने मजुरांच्या समस्येवर मात शक्य`

परभणी : परभणी जिल्ह्यात यंदा प्रथमच कारेगाव (ता. परभणी) येथील प्रगतिशील शेतकरी ज्ञानोबाराव कारेगावकर यांच्या शेतावर बुधवारी (ता. २६) ट्रॅक्टरचलित यंत्राद्वारे कपाशीची लागवड करण्यात आली. यांत्रिक पद्धतीने कपाशी लागवड केल्यास मजुरांच्या समस्येवर मात करता येईल. कमी वेळेत जास्त क्षेत्रावर लागवड करणे शक्य होईल, अशी माहिती कोरेगावकर यांनी दिली. 

ट्रॅक्टरचलित टोकन यंत्राद्वारे कपाशीच्या लागवडी वेळी जिल्हाधिकारी पी. शिवशंकर, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बी.पी., तहसिलदार विद्याचरण कडावकर, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी एच. एम. ममदे, कृषी अधिकारी एस. शिसोदे, ज्ञानोबाराव कारेगावकर, हर्षल पाटील आदी उपस्थित होते.

या यंत्राद्वारे दोन ओळीतील अंतर ३ बाय साडेतीन फूट ठेवून कपाशीची लागवड करता येते. दोन झाडांतील अंतर ६ इंच ठेवता येते. कमी कालावधीत येणाऱ्या, एकाच वेळी जास्तीत जास्त बोंडे फुटणाऱ्या वाणाची लागवड करण्यात आली. त्यामुळे यांत्रिक पद्धतीने वेचणीदेखील करता येईल.

कपाशीच्या लागवडीसोबत खताची पेरणी करण्यात आली. मजुरांवरील खर्च वाढत असल्यामुळे कपाशीचा उत्पादन खर्च वाढला आहे. लागवडीपासून वेचणीपर्यंत यांत्रिकीरणाचा अवलंब केल्यास उत्पादनखर्च कमी करून मजुरांच्या समस्येवर मातदेखील करता येईल, असे या वेळी सांगण्यात आले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com