`मॉन्सून काळातील आपत्ती व्यवस्थापन आराखडा बनवा`

नाशिक : पावसाळ्याच्या कालावधीत कोणत्याही प्रकारची हानी होणार नाही, यासाठी विभागातील सर्व जिल्हास्तरीय यंत्रणांनी समन्वयाने नियोजनपूर्वक आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करावा.
Create a monsoon disaster management plan
Create a monsoon disaster management plan

नाशिक : ‘‘पावसाळ्याच्या कालावधीत कोणत्याही प्रकारची हानी होणार नाही, यासाठी विभागातील सर्व जिल्हास्तरीय यंत्रणांनी समन्वयाने नियोजनपूर्वक आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करावा. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी आवश्यक सोयीसुविधा सज्ज ठेवण्यावर भर द्यावा’’, अशा सूचना विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी विभागातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या.

विभागीय आयुक्त कार्यालयात गुरुवारी (ता.२७) मॉन्सूनपूर्व तयारीचा विभागीय आढावा दूरदृष्यप्रणालीद्वारे घेण्यात आला. सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता पी. बी. भोसले, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता डॉ. संजय बेलसरे, प्रादेशिक मुख्य वनसंरक्षक नितीन गुदगे आदी विभागीय आयुक्त कार्यालय येथून, तर दूरदृष्यप्रणालीद्वारे नाशिक जिल्हाधिकारी सूरज मांढरे, नगर जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, धुळ्याचे जिल्हाधिकारी संजय यादव, जळगावचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत, नंदुरबारचे जिल्हाधिकारी राजेंद्र भारुड, नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त कैलास जाधव, आदी उपस्थित होते. 

गमे यांनी केल्या या सूचना

मॉन्सूनच्या काळातील संभाव्य आपत्ती लक्षात घेता सर्व यंत्रणांनी आपल्या -विभागाच्या आपत्ती निवारणासाठी नियोजन करून सज्ज राहावे. प्रत्येक विभागाने नियंत्रण कक्षाची स्थापना करून समन्वय अधिकाऱ्याची नियुक्ती करावी. पूरप्रवण भागात शोध व बचाव साहित्य पोच करण्यासह साहित्य चालुस्थितीत असल्याची खात्री करावी. जलसंपदा विभागाने धरणांची सुरक्षितता तपासून घ्यावी. पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास तात्पुरत्या निवारा जागांची निश्चिती करावी.

हवामानाच्या सूचना समाजमाध्यमांद्वारे पोचवा

पुराचा धोका असलेल्या भागांना धोक्याची पूर्वसूचना देण्यासाठी जळगाव जिल्ह्याने तयार केलेल्या बहुउद्देशीय आपत्कालीन डिजिटल दवंडी सायरन प्रणाली इतर जिल्ह्यांनीही राबवावी. या सोबतच पुराचा धोका असणाऱ्या गावांना हवामानासंबंधित सूचना समाजमाध्यमांद्वारे पोचविण्याचा प्रयत्न करावा, असेही गमे यांनी सांगितले.  

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com