नगरमध्ये मिळाला पीकविमा; श्रेयासाठी चढाओढ

अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर गेल्या वर्षीच्या खरिपातील पिकांच्या नुकसानी बद्दल नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना साडेआठ कोटी रुपयांचा पीकविमा जाहीर झाला आहे.
नगरमध्ये मिळाला पीकविमा; श्रेयासाठी चढाओढ Crop insurance found in town; Fight for credit
नगरमध्ये मिळाला पीकविमा; श्रेयासाठी चढाओढ Crop insurance found in town; Fight for credit

नगर : अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर गेल्या वर्षीच्या खरिपातील पिकांच्या नुकसानी बद्दल नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना साडेआठ कोटी रुपयांचा पीकविमा जाहीर झाला आहे. मात्र आता मिळालेल्या पीकविम्याचे श्रेय घेण्यासाठी नेत्यांमध्ये चढाओढ लागली आहे. पीकविमा कसा मिळाला, या बाबत पत्रकबाजी सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे.  नगर जिल्ह्यात गेल्या वर्षी खरिपात पंतप्रधान पीकविमा योजनेतून ४ लाख ६६ हजार शेतकऱ्यांनी २ लाख ५९ हजार हेक्टर क्षेत्रावर विमा उतरला होता. गेल्या वर्षी नगर जिल्ह्यात  अति पाऊस, वादळ व अन्य कारणाने शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे विम्याचा लाभ मिळेल, अशी आशा असल्याने शेतकरी कृषी विभागाला विचारणा करत होते. गतवर्षीच्या खरिपातील अन्य जिल्ह्याचा विमा जाहीर होऊनही नगर जिल्ह्यात मात्र विमा कंपनीकडून दुर्लक्ष केले जात असल्याने शेतकरी मराठा महासंघाचे नेते संभाजी दहातोंडे यांनी पाठपुरावा केला होता. ‘ॲग्रोवन’ नेही गतवर्षाच्या खरिपाबाबतच्या रखडलेल्या विम्याची वस्तुस्थिती सातत्याने मांडली. अखेर चार दिवसांपूर्वी नगर जिल्‍ह्यातील गतवर्षीचा खरीप विमा जाहीर झाला. त्यात साडेपाच कोटी रुपये पावसामुळे नुकसान झाल्याचे तर तीन कोटी रुपये उत्पादन घटल्याचे मिळाले आहेत. श्रेयासाठी चढाओढ सुरू आहे. रक्कम घटल्याबाबत कोण बोलणार? नगर जिल्ह्यात गेल्या वर्षी खरिपात ४ लाख ६६ हजार शेतकऱ्यांनी २ लाख ५९ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचा विमा उतरवला होता. त्यातून विमा कंपनीला केवळ शेतकरी हप्ता १७ कोटींचा गेला. विम्यातून साडेसातशे कोटी रुपये संरक्षित झाल्याचे सांगितले. प्रत्यक्षात केवळ साडेआठ कोटींची भरपाई दिली. शेतकरी संख्या व हेक्टर क्षेत्र समतोल ठेवले असले तरीही भरपाईची टक्केवारी कमी झाल्याचे दिसत आहे. विमा मिळाल्याचे श्रेय घेणारे नेते विमा कंपन्यांच्या नफेखोरीवर आणि शेतकऱ्यांना कमी भरपाई मिळाली यावर कधी आवाज उठवणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com