कवठेमहांकाळ तालुक्यात पिकाचे पंचनामे पूर्ण; नुकसान भरपाई कधी?

घाटनांद्रे, जि. सांगली ः कवठेमहांकाळ तालुक्यात झालेल्या मॉन्सूनोत्तर पावसाने तालुक्याच्या घाटमाथ्यावरील सहा गावांमधील ४०३ शेतकऱ्यांच्या १४०.२२ हेक्टर क्षेत्रातील बागायत व फळ पिकांचे नुकसान झाले आहे, अशी माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली.
 कवठेमहांकाळ तालुक्यात पिकाचे पंचनामे पूर्ण; नुकसान भरपाई कधी?
Crop Punchnama completed in Kavthemahankal taluka; When to compensate?

घाटनांद्रे, जि. सांगली ः कवठेमहांकाळ तालुक्यात झालेल्या मॉन्सूनोत्तर पावसाने तालुक्याच्या घाटमाथ्यावरील सहा गावांमधील ४०३ शेतकऱ्यांच्या १४०.२२ हेक्टर क्षेत्रातील बागायत व फळ पिकांचे नुकसान झाले आहे, अशी माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली.

१ ते ४ डिसेंबर या कालावधीत कवठेमंहाकाळ तालुक्यात अवकाळी पावसाने मोठा धुमाकूळ घालून शेतकऱ्यांच्या फळपीक व शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. या पार्श्वभूमीवर शासकीय आदेशानुसार कवठेमंहाकाळ तालुक्याच्या घाटमाथ्यासह तालुक्यात नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्यात आले. मात्र, नुकसान भरपाई देण्यात आली नाही.

घाटमाथ्यावरील गाव कामगार तलाठी वैभव पाटील, बी. ए. माने कृषी सहाय्यक जी. एस. कोलगणे यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन नुकसानग्रस्त पिकाचे पंचनामे केले. त्यानुसार घाटमाथ्यावरील वाघोली वगळता सहा गावांतील ४०३ शेतकऱ्यांच्या १४०.२२ हेक्‍टर क्षेत्रामधील बागायत व फळपिकांचे नुकसान झाले आहे. 

कवठेमंहाकाळ तालुक्यातील ३९०० शेतकऱ्यांचे १५५९.४९ हेक्टर फळपिकांचे, तर ०५.५८ बागायती क्षेत्रातील पिकाचे नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना बागायत व फळपिकांची नुकसान भरपाई मिळावी, अशी अपेक्षा घाट माथ्यासह तालुक्यातील शेतकरी करीत आहेत. 

तालुक्याच्या घाटमाथ्यावरील गावातील शेतकरी, नुकसानग्रस्त पीक (हेक्टरमध्ये) पुढील प्रमाणे ः कुची (१२३) ४५.३१, जाखापूर (८०) २७.८३. घाटनांद्रे (८६) २५.२० तिसंगी (६५)२७.०० गर्जे वाडी (१३)०४.५० कुंडलापूर (३६) १०.३८, वाघोली कोणतेही नुकसान नाही. कवठे महांकाळ तालुका (३९००) तालुका फळपीक क्षेत्र (१५५९.४९) तालुका बागायत क्षेत्र (०५.५८) कवठेमहांकाळ तालुक्यातही या अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात पिकांचे, फळपीक व शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले.

या पार्श्वभूमीवर शासकीय आदेशानुसार कवठेमहांकाळ तालुक्याच्या घाटमाथ्यासह तालुक्यात नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्यात आले. मात्र, नुकसान भरपाई देण्यात आली नाही. फक्त नेत्यांकडून आश्वासन देण्यात येत आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com