खानदेशात पीके पाण्याअभावी कोमजली

मंगरूळ प्रकल्प जुलैमध्येच १०० टक्के भरायचा. मागील वर्षी तो सप्टेंबरमध्ये भरला होता. यंदाही पावसाचा खंड पडल्याने तो भरण्याची शक्यता आहे. - रमेश पाटील, शेतकरी, मंगरूळ, जि. जळगाव
खानदेशात पीके कोमजली
खानदेशात पीके कोमजली

जळगाव ः जळगाव आणि धुळे जिल्ह्यात मागील १० ते ११ दिवसांपासून पावसाने आोढ दिली आहे. उकाडा व उष्णता वाढल्याची स्थिती आहे. परिणामी, खरिपाची पिके पाण्याअभावी कोमेजू लागली असून, त्यासाठी जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे.  जिल्ह्याच्या पूर्व भागातील रावेर, यावल, बोदवड व मुक्ताईनगरात पाऊस नाही. ऊन तापत असल्याने हलक्‍या, मुरमाड जमिनींच्या भागात पिके कोमेजू लागली आहेत. उडीद, मूग ही पिके फुलोऱ्यावर आहेत. काही ठिकाणी मुगाला शेंगा लागत आहेत. अशा स्थितीत जोरदार पावसाची अपेक्षा आहे. पावसाअभावी पिकांच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्‍यता आहे. हलक्या जमिनीत फूलगळ, दाणे न भरणे अशा समस्या निर्माण होऊ शकतात. कोरडवाहू कापसाचे पीक बरे आहे. पूर्वहंगामी कापसात फुले, पाते लागत आहेत. काळ्या कसदार जमिनीत पिके तग धरून आहेत.  रावेर, यावलमधील सुकी, अभोरा, मंगरूळ, मोर या प्रकल्पांमधील जलसाठा ५० टक्‍क्‍यांच्या खालीच आहे. चोपडा तालुक्‍यातील गूळ, अनेर प्रकल्पातही जलसाठा कमीच आहे. अनेर प्रकल्पात तर फक्त २३ टक्के जलसाठा आहे. तर पश्‍चिम भागातील अग्नावती, बहुळा, भोकरबारी, तोंडापूर, मन्याड, अंजनी या प्रकल्पांमध्ये साठा नाही. जुलैमध्ये जिल्ह्यात सरासरीच्या ५० टक्केही पाऊस झालेला नाही.  धुळे जिल्ह्यातही पावसाचा खंड पडला आहे. जिल्ह्यात पश्‍चिम भागात साक्री तालुक्‍यातील मुरमाड जमिनींच्या भागात पीकस्थिती नाजूक बनत आहे. तर शिंदखेडा व धुळे तालुक्‍यातील पूर्व भागातही पावसाची नितांत गरज आहे. जिल्ह्यात जुलैमध्ये सरासरीच्या ४० टक्केही पाऊस झाला नाही. अमरावती प्रकल्प कोरडाच आहे. पांझरा प्रकल्पात थोडा जलसाठा आहे. तापी नदी वगळता इतर नद्यांना चांगला पूर आलेला  नाही. 

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com