तळणी येथील कृषी विकास संस्थेचा राष्ट्रीय स्तरावर सन्मान

तळणी येथील कृषी विकास संस्थेचा राष्ट्रीय स्तरावर सन्मान
अकोला ः तळणी येथील कृषी विकास संस्थेला मिळालेला पुरस्कार स्वीकारताना संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित नाफडे.
अकोला ः मोताळा तालुक्यातील तळणी येथील कृषी विकास व ग्रामीण प्रशिक्षण संस्थेला इंडिया सीएसआर समीट २०१७ मध्ये ‘सीएसआर इम्प्लिमेंटिंग एजन्सी आॅफ द इअर’ या पुरस्काराने गौरविण्यात आले. 
 
हा पुरस्कार एचडीएफसी बॅंकेसोबत राबविलेल्या प्रकल्पांच्या परिणामकारक अंमलबजावणीसाठी देण्यात आला. या वेळी प्रत्याश पंड्या, गौरव कपूर, रिचा वाजपेयी, रमोन हम्झाई यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.
 
कृषी विकास व ग्रामीण प्रशिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित नाफडे, गजेंद्र दीक्षित व मनीषा गावडे यांनी पुरस्कार स्वीकारला. केंद्रीय कृषिराज्यमंत्री गजेंद्र सिंग शेखावत यांनी सर्व पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले. 

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.