गिरिराज, ब्लॅक ॲस्ट्रॉलार्प ठरताहेत ‘फेव्हरेट’

सध्या या जातींची मागणी पाहून आम्ही जिल्हा नियोजन मंडळाकडून जादा निधी मिळण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. सध्या सहा शेडमधून पैदास सुरू आहे. जादा रकमेची तरतूद झाल्यास हव्या तितक्‍या प्रमाणात आम्ही या कोंबड्या उपलब्ध करून देऊ. - डॉ. सॅम लुद्रीक, पशुधन विकास अधिकारी,मध्यवर्ती अंडी उबवण केंद्र, कोल्हापूर
गिरिराज, ब्लॅक ॲस्ट्रॉलार्प ठरताहेत ‘फेव्हरेट’
गिरिराज, ब्लॅक ॲस्ट्रॉलार्प ठरताहेत ‘फेव्हरेट’

कोल्हापूर : येथील मध्यवर्ती अंडी उबवण केंद्रात पैदास होत असलेल्या गिरिराज व ब्लॅक ॲस्ट्रॉलार्प जातीच्या कोंबड्यांनी गेल्या काही महिन्यांपासून पश्‍चिम महाराष्ट्राबरोबरच कोकणातील ग्राहकांकडूनही पसंती मिळविली आहे. या केंद्रातून दर आठड्याला सुमारे सात हजार पिलांची विक्री या केंद्रामार्फत होत आहे. 

केंद्र सरकारने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यातून शेतीपूरक उद्योगांना चालना देण्यात येत आहे. त्याचाच भाग म्हणून येथील मध्यवर्ती अंडी उबवण केंद्राने या दोन जातींच्या कोंबड्यांची पैदास करण्याला पसंती दिली आहे. अंड्यांसह व्यवसायासाठीही या कोंबड्या उपयुक्त ठरणार आहेत. 

केंद्रातील सहा शेडच्या माध्यमातून कोंबड्यांची विक्री केली जात आहे. इतर कोंबड्यापेक्षा वजनाने अणि अंडी देण्याच्या क्षमतेत या जातीच्या कोंबड्या अधिक दर्जेदार आहेत. इतर गावठी कोंबड्यांचे वजन दीड किलोच्या आसपास असते तर या कोंबड्यांचे वजन अडीच ते तीन किलोंपर्यंत असते. या कोंबड्या आपल्या पूर्ण जीवनक्रमात एकशे पन्नास ते एकशे ऐंशी अंडी देतात. इतर कोंबड्यांच्या तुलनेत हे प्रमाण दुप्पट आहे. यामुळे या कोंबड्यांना बाळगणे हे फायदेशीर ठरते.

अलीकडच्या काळात उत्पादकांना याचे महत्त्व कळू लागले आहे. यामुळे केंद्राच्या वतीनेही सातत्याने जादा पैदाशीसाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. एका दिवसाच्या पिलास वीस रुपये या दराने ही विक्री सुरू आहे.

भविष्यात इतर जातींच्या कोंबड्याची पैदास करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सध्या गिरिराज, ब्लॅक अॅस्ट्रोलार्पची पैदास सुरू आहे. येत्या काही दिवसांत आरआयआर, कावेरी, ग्रामप्रिया, हरिप्रिया जातींच्या कोंबड्यांची पैदास येथे करण्यात येईल.   पैदाशीपेक्षा मागणी अधिक  या जातीच्या कोंबड्यांना शेतकरी व ग्राहकांकडूनही पसंती मिळत आहे. सातारा, सांगली, सिंधुदुर्ग भागांतून सातत्याने मागणी येत असल्याचे केंद्राच्या सूत्रांनी सांगितले. अनेकदा मागणीइतका पुरवठा होत नसल्याची परिस्थितीही निर्माण होते. इतकी मागणी या जातींच्या कोंबड्यांना आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com