महिला शेतकरी कंपनीने थाटला डाळमिल प्रकल्प

महिला शेतकरी कंपनीने थाटला डाळमिल प्रकल्प
डाळमिल प्रकल्प पाहणी

बुलडाणा ः जिल्ह्यातील महिलांची असलेल्या जीवनसांगिनी कृषी विकास शेतकरी उत्पादक कंपनीने आता डाळमिल क्षेत्रात पाऊल टाकले आहे. या प्रकल्पाचा मोताळा तालुक्यातील शेलापूर बुद्रुक येथे रविवारी (ता. १५) शुभारंभ करण्यात आला. प्रकल्पाचे उद्घाटन नाबार्डचे जिल्हा विकास प्रबंधक सुभाष बोदाडे यांच्या हस्ते झाले. या वेळी कृषी विकास व ग्रामीण प्रशिक्षण संस्थेचे अध्यक्ष दिलीप नाफडे, शेलापूरचे सरपंच उमेश वाघ यांची प्रमुख उपस्थिती होती.  जीवनसांगिनी कृषी विकास शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये पाचशेपेक्षा जास्त महिला सभासद असून, सदर कंपनीची स्थापना सन २०१३ मध्ये झालेली आहे. या कंपनीद्वारा आतापर्यंत शेतकऱ्यांची तूर व हरभरा खरेदी, सभासदांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा, प्रशिक्षण अशा विविध उपक्रम राबविण्यात आले असून, महाराष्ट्रातील पहिली महिला शेतकरी उत्पादक कंपनी अशी या कंपनीची नोंद आहे. कंपनीच्या या उपक्रमाने सभासद शेतकऱ्यांना फायदा होणार असून, परिसरातील इतर शेतकऱ्यांनासुद्धा त्याचा लाभ दिला जाणार आहे. या उद्घाटनप्रसंगी सरपंच श्री. वाघ यांनी या कंपनीकडून उत्पादित होणाऱ्या डाळीच्या प्रचारासाठी ग्रामपंचायतीमार्फत ५००० रुपये मदत जाहीर केली. नाबार्डसुद्धा कंपनीला सहकार्य करू शकते याचा ऊहापोह श्री. बोंदाडे यांनी केला. अमित नाफडे यांनी कंपनीच्या वाटचालीची माहिती दिली. शालिनी कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. दीपाली मानकर यांनी सूत्रसंचालन केले. या प्रसंगी कंपनीच्या संचालिका संगीता झोपे, पुष्पा नारखेडे, सुलोचना तायडे व शीला चोपडे यांच्यासह इतर महिला उपस्थित होत्या.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.