नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात वादळ वाऱ्यासह पावसाने फळपिकांचे नुकसान

नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात शुक्रवारी (ता.१५) सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांत अनेक मंडळांत वादळी वाऱ्यासह हलका ते जोरदार पाऊस झाला. फळपिके, उन्हाळी पिकांचे नुकसान झाले. वीज कोसळून चार ठार, तर नऊजण जखमी झाले. या शिवाय परभणी जिल्ह्यात तीन जनावरे दगावली.
Damage to fruits in Nanded, Parbhani, Hingoli districts due to rains
Damage to fruits in Nanded, Parbhani, Hingoli districts due to rains

नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात शुक्रवारी (ता.१५) सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांत अनेक मंडळांत वादळी वाऱ्यासह हलका ते जोरदार पाऊस झाला. फळपिके, उन्हाळी पिकांचे नुकसान झाले. वीज कोसळून चार ठार, तर नऊजण जखमी झाले. या शिवाय परभणी जिल्ह्यात तीन जनावरे दगावली. 

नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर, हदगाव, किनवट, माहूर, हिमायतनगर, देगलूर, मुखेड, कंधार तालुक्यातील २२ मंडळांत पावसाची नोंद झाली. शेतामध्ये काम करताना, झोपडीवर तसेच झाडावर वीज कोसळल्याने नायगाव, हिमायतनगर, हदगाव, किनवट तालुक्यात प्रत्येकी एक जण ठार झाला. तर, एकूण नऊ जण जखमी झाले. टरबूज, केळी, आंबा या फळ पिकांसह भाजीपाला, उन्हाळी पिकांचे नुकसान झाले. 

परभणी जिल्ह्यातील परभणी, जिंतूर, सेलू, पालम, गंगाखेड तालुक्यातील ११ मंडळांमध्ये हलका ते जोरदार पाऊस झाला. वादळी वाऱ्यामुळे पिकांचे नुकसान झाले. वीज कोसळून जिंतूर तालुक्यातील वाघी धानोरा येथे बैलजोडी, तर सेलू तालुक्यातील सोनवटी येथे म्हैस ठार झाली. हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली, कळमनुरी, वसमत, औंढा नागनाथ, सेनगाव तालुक्यातील अनेक मंडळांत हलका ते जोरदार पाऊस झाला.  मंडळनिहाय पाऊस (मि.मी.)  

नांदेड जिल्हा ः अर्धापूर ३५, दाभड १, मालेगाव २, तामसा १६, आष्टी १२, किनवट ७, इस्लापूर ७, बोधडी २, देहली ४, जलधारा १, शिवणी ५, माहूर १, वानोळा १, वाई ४, सरसम २, देगलूर ३, मरखेल २,हनेगाव ७,मालेगाव ३, बाऱ्हाळी २, कुरुळा २, पेठवडज ७.  परभणी जिल्हा ः परभणी शहर १,पेडगाव २.७०, पिंगळी २,कृषी विद्यापीठ वेधशाळा ६.६, जिंतूर २, आडगाव ७, सेलू ७,चिकलठाणा १९,गंगाखेड १३,महातपुरी ९,पालम १३, बनवस १४.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com