Damage of mug, maize, cotton from rats in Shindkheda taluka
Damage of mug, maize, cotton from rats in Shindkheda taluka

शिंदखेडा तालुक्यात उंदरांकडून मुग, मका, कापसाचे नुकसान

चिमठाणे, जि. धुळे ः बेटावद (ता. शिंदखेडा) परिसरात कापूस, मुग व मका पिकावर उंदरांची धाड पडल्याने शेतकरी संकटातच सापडले आहेत.

चिमठाणे, जि. धुळे  ः बेटावद (ता. शिंदखेडा) परिसरात कापूस, मुग व मका पिकावर उंदरांची धाड पडल्याने शेतकरी संकटातच सापडले आहेत. कृषी विभागाने अनुदानवर किडनाशके उपलब्ध करून वन्यप्राणी, उंदरांचा बंदोबस्त करण्यास मदत करावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. 

शिंदखेडा तालुक्यात यंदा काही गावांमध्ये चांगला, तर काही गावांत तुरळक पाऊस पडत आहे. जून महिन्यात कोरडवाहू कापूस, मका, मुग, बाजरी, ज्वारी, भुईमूग आदी पिंकाची पेरणी करण्यात आली. बेटावद महसूल मंडळात चांगला पाऊस झाल्याने पिके डोलू लागली आहेत. मुगाचा हंगाम चांगला आहे. मुगाच्या शेगांवर काही दिवसांपासून उंदीर ताव मारत आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. मका पिकाचे दाणे व कापूस पिकातील बोंडे उंदीर फस्त करीत आहेत. 

रानडुकरेदेखील काही भागात उपद्रव करीत असून, मका, ज्वारी व मुगाचे नुकसान करीत आहेत. शेतकऱ्यांना पिकांचे संरक्षण करण्यासाठी रात्रीदेखील अनेकदा जावे लागत आहे. कापसावर गुलाबी बोंड अळी आली. आता उंदरे व वन्यप्राण्यांचे नवे संकट उभे ठाकले आहे.

कोरोनामुळे शेतमालास हवा तसा बाजारभाव नसल्याने शेतकरी अर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यात इतर समस्या येत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात आहेत. यासंदर्भात वन विभाग व कृषी विभागाने मदत करावी. किडनाशके अनुदानावर उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी केली जात आहे.  "काढणीस आलेल्या मुगाच्या शेंगा उंदीर फस्त करीत आहेत. मक्याच्या दाण्यावर व कापसांच्या बोंडांचेही उंदीर कुरतडून नुकसान करीत आहेत. शासनाने कृषी विभागामार्फत अनुदानवर किडनाशक उपलब्ध करून द्यावे.  - ईश्वर परदेशी, शतकरी, अंजदे बुद्रुक, ता. शिंदखेडा, जि.धुळे)  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com