खराब झालेल्या सोलर  पॅनेलची नुकसान भरपाई द्या 

धानोरा तालुक्यातील गिरोला येथील सुरेश मनकू मडावी यांना मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेअंतर्गत मिळालेल्या कृषिपंपाचे सोलर पॅनेल वादळ व पावसाने खराब झाले.
 खराब झालेल्या सोलर  पॅनेलची नुकसान भरपाई द्या 
Damaged solar Compensate the panel

गडचिरोली : धानोरा तालुक्यातील गिरोला येथील सुरेश मनकू मडावी यांना मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेअंतर्गत मिळालेल्या कृषिपंपाचे सोलर पॅनेल वादळ व पावसाने खराब झाले. मात्र, संबंधित विभागाच्या कार्यालयाचे उंबरठे झिजवूनही अद्याप त्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही. त्यामुळे मायबाप सरकारने आपल्याला सोलर पॅनेल दुरुस्त करून द्यावे किंवा नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकरी सुरेश मडावी यांनी केली आहे.  सुरेश मडावी यांनी या संदर्भात दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, माझ्या शेतात २०१९-२०२०मध्ये मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेअंतर्गत एका कंपनीचे सोलर पॅनेल लावण्यात आले. मात्र, १६ मे २०२१ला वादळ व पावसाने सोलर पॅनेलचे नुकसान झाले. त्यामुळे काही प्लेट, अँगल, रॉड व नटबोल्ट खराब झाले. त्यामुळे ही माहिती त्यांनी महावितरण विभाग कार्यालय धानोरा २ कार्यकारी अभियंता महावितरण विभाग गडचिरोली ३ अधीक्षक अभियंता महावितरण विभाग गडचिरोली यांना लेखी अर्ज केला. त्यांना नुकसानभरपाईची मागणी केली. नुकसानग्रस्त सोलर पॅनेलचा मोका पंचनामा ग्रामपंचायत गिरोलाकडून करून घेतला. संबंधित पुरवठादाराकडे पडलेल्या सोलर पॅनेलचा फोटो व पंचनामा लिहिलेला फोटो व्हॉट्सअ‍ॅपद्वारे पाठवला. परंतु, आजपर्यंत महावितरण किंवा पुरवठादाराकडील एकही व्यक्ती माझ्या शेतात सोलर पॅनेल दुरुस्तीसाठी आलेली नाही. मी स्वत: शेतात राबतो. सोलर कृषिपंप बंद असल्याने धानाचे पीक पाण्याअभावी कसेबसे काढले. आता लावण्यासाठी नांगरणी केली. मात्र, सोलर पॅनेल खराब असल्याने कृषिपंपातून पाणीच येत नाही. त्यामुळे हतबल झालो असून, नैराश्य आले आहे. त्यामुळे महावितरण किंवा संबंधित कंपनीने माझी अडचण समजून घ्यावी. सोलर पॅनेल दुरुस्त करावे किंवा नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी सुरेश मडावी यांनी केली आहे. 

अभियंता म्हणतात माहिती काढतो...  या संदर्भात महावितरणचे धानोरा येथील अभियंता देशोपाल शेंडे यांना विचारणा केली असता या प्रकरणाबद्दल आपल्याला माहिती नाही. पण, लवकरच माहिती काढून काय करता येईल ते सांगतो, असे म्हटले आहे.   

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.