मृत कर्जदारांची सुधारित माहितीसाठी २९ ची मुदत

कर्जमुक्ती योजनेअंतर्गत मृत कर्जदारांची सुधारित अद्ययावत माहिती संगणकीय प्रणालीवर सादर करण्यासाठी शनिवार (ता.२९) पर्यंत बँकांना मुदत देण्यात आली आहे.
मृत कर्जदारांची सुधारित  माहितीसाठी २९ ची मुदत
Deadline of 29 for revised information of deceased borrowers

बुलडाणा : कर्जमुक्ती योजनेअंतर्गत मृत कर्जदारांची सुधारित अद्ययावत माहिती संगणकीय प्रणालीवर सादर करण्यासाठी शनिवार (ता.२९) पर्यंत बँकांना मुदत देण्यात आली असून, माहिती सादर न झाल्यास यापुढे संबंधित जबाबदारी बँकांची राहील, अशी सूचना जिल्हा उपनिबंधकांनी केली आहे.  याबाबत त्यांनी म्हटले, की राज्यात एक एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ या कालावधीमध्ये पीककर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना सुरू करण्यात आली आहे. योजनेअंतर्गत मृत कर्जदारांच्या बाबतीत सुधारित अद्ययावत माहिती संगणकीय प्रणालीवर (पोर्टल) अपलोड करण्यासाठी २२ ऑक्टोंबर ते आठ डिसेंबर २०२१ या कालावधीत योजनेच्या सेंट्रल टीममार्फत बँकांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. या सुविधेची कार्यपद्धती बँकांना ई-मेलद्वारे सेंट्रल टीमवरून पाठविण्यात आली होती. तथापि, याबाबत अद्याप बँकांच्या स्तरावर कार्यवाही प्रलंबित असल्याचे दिसून येते. या बाबतीत मृत कर्जदारांची सुधारित अद्ययावत माहिती संगणकीय प्रणालीवर सादर करण्यासाठी अंतिम संधी म्हणून २९ जानेवारीपर्यंत उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यानंतर अशी सुविधा बँकांना उपलब्ध राहणार नाही व ज्या मृत कर्जदारांच्या बाबतीत सुधारित अद्ययावत माहिती योजनेच्या संगणकीय प्रणालीवर सादर न झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी बँकेची राहील. तसेच, मृत कर्जदार सभासदाच्या वारसांनी संबंधित बँकेशी संपर्क साधून वारसाचे कागदपत्रे संकेतस्थळावर सादर करावीत, असे आवाहनही जिल्हा उपनिबंधकांनी केले आहे.   ---------  

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com