नगर जिल्ह्यात साडेपाच हजार शेतकऱ्यांना कर्जमाफी

नगर ः राज्य सरकारच्या धोरणानुसार महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना २०१९ नुसार राज्यात सर्वाधिक शेतकरी व सर्वांत जास्त रक्कम नगर जिल्ह्याला मिळाली आहे.
Debt waiver for five and a half thousand farmers in Nagar district
Debt waiver for five and a half thousand farmers in Nagar district

नगर ः राज्य सरकारच्या धोरणानुसार महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना २०१९ नुसार राज्यात सर्वाधिक शेतकरी व सर्वांत जास्त रक्कम नगर जिल्ह्याला मिळाली आहे. यापूर्वी विविध कारणांनी प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांनाही कर्जमाफी मिळाली आहे. यादीही प्रसिद्ध झाली आहे. जिल्ह्यातील पाच हजार ३०० शेतकऱ्यांना याचा लाभ मिळेल, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांनी दिली.

नगर जिल्ह्यात यापूर्वी दोन लाख ८९ हजार १४४ शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली होती. त्यापोटी एक हजार ७४१ कोटींचा निधी जिल्ह्यात देण्यात आला. कर्जमाफीतून विविध कारणांनी काही शेतकरी प्रलंबित होते. अशा शेतकऱ्यांच्या तृटी दूर होऊन कर्जमाफीची प्रक्रिया झाली आहे. या बरोबरच आधार प्रमाणीकरण न झालेले; परंतु पात्र सुमारे सहा हजार ८२३ शेतकरी आहेत. त्यांनाही १५ नोव्हेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. 

ही शेतकऱ्यांना अंतिम संधी असेल. त्यानंतर अपात्र राहिलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळण्याची शक्यता कमी आहे. मृत शेतकऱ्यांच्या वारसांनाही कर्जमाफीचा लाभ मिळेल. त्यांनी मृत्यूचा दाखला, वारस नोंद आदी कागदपत्रे, आधार प्रमाणीकरण करून आठ नोव्हेंबरपर्यंत जमा करण्यास मुदतवाढ मिळाली आहे. त्यामुळे पात्र सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळू शकणार आहे.

कर्जमाफी मिळविण्याची ही शेवटची संधी असू शकते. पात्र शेतकऱ्यांनी जवळच्या सेतू केंद्रातून आधार प्रमाणीकरण करून घ्यावे. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून या योजनेचा लाभ घ्यावा. - दिग्विजय आहेर, जिल्हा उपनिबंधक.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com