खानदेशात मूग उत्पादनात घट

जळगाव ः खानदेशात मुगाचे उत्पादन फारसे हाती येत नसल्याची स्थिती आहे. पावसाचा लहरीपणा आणि इतर समस्यांमुळे उत्पादन अल्प आहे. अनेक शेतकऱ्यांचे पीक होरपळल्याने वाया गेले. परिणामी शेतकऱ्यांना फटका बसला आहे.
Decline in green gram production in Khandesh
Decline in green gram production in Khandesh

जळगाव ः खानदेशात मुगाचे उत्पादन फारसे हाती येत नसल्याची स्थिती आहे. पावसाचा लहरीपणा आणि इतर समस्यांमुळे उत्पादन अल्प आहे. अनेक शेतकऱ्यांचे पीक होरपळल्याने वाया गेले. परिणामी शेतकऱ्यांना फटका बसला आहे. 

मुगाची पेरणी जूनच्या अखेरच्या आठवड्यापर्यंत करणे अपेक्षित होते. परंतु जूनमध्ये पावसाने ओढ दिली. जळगावमधील चोपडा, जळगाव, अमळनेर, पारोळा, नंदुरबारमधील तळोदा, शहादा, नंदुरबार, धुळ्यात शिंदखेडा, शिरपूर भागात अनेक शेतकरी पेरणीच करू शकले नाहीत. ज्यांची पेरणी तरली. त्या शेतकऱ्यांच्या पिकाला जुलैच्या अखेरीस सुरू झालेल्या आणि ऑगस्टच्या मध्यापर्यंत राहिलेल्या पावसाच्या खंडाने फटका बसला. पीक होरपळले. यात पिकाचे अतोनात नुकसान झाले. 

पिकाला शेंगा हव्या तशा लागल्या नाहीत. फूलगळ झाली. १६ ऑगस्टपासून २१ ऑगस्टपर्यंत अनेक भागात पाऊस झाला. यात होत्या तेवढ्या शेंगांचेही नुकसान झाले. काही शेतकऱ्यांच्या हाती उत्पादन आले. पण ते फारसे नाही. एकरी २० ते २५ किलो उत्पादनदेखील अनेक शेतकरी घेऊ शकले नाहीत. पुरेसा चाराही मुगापासून हाती आलेला नाही, अशी स्थिती आहे. 

केवळ खर्च निघाला 

पेरणीला जेवढा खर्च आला, तेवढाच हाती आला, अशी अवस्था अनेक भागात आहे. यामुळे बाजारातही मुगाची फारशी आवक शेतकऱ्यांकडून होत नसल्याचे चित्र आहे. बाजार समितीत व्यापारी ते व्यापारी, असे व्यवहार सुरू आहेत. मूग पिकाखालील क्षेत्र तयार करून त्यात शेतकरी चांगल्या पावसाची अपेक्षा करीत आहेत. काळ्या कसदार जमिनीत चांगला पाऊस झाल्यास पुढे दादर ज्वारी, कोरडवाहू हरभरा पिकाचे नियोजन यशस्वी होऊ शकेल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com