द्राक्ष नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नाशिक  : सध्या सुरू असलेल्या पावसामुळे द्राक्ष पट्ट्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. त्यामुळे पूर्वहंगामी व हंगामी अशा दोन्ही द्राक्ष बागा पावसाच्या तडाख्यात सापडल्या आहेत. डाऊनी, करप्याचा प्रादुर्भावासह, पोंगा अवस्थेतील नुकसान आणि घडकुजमुळे द्राक्ष बागांना फटका बसला आहे. त्यामुळे शासनाने तातडीने सर्व्हे आणि पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, तसेच या नुकसानीचा अंतर्भाव हवामानाधारित पीकविमा योजनेत करावा, अशी मागणी द्राक्ष उत्पादक शेतकरी करीत आहेत. 

पूर्वहंगामी द्राक्ष उत्पादन घेणाऱ्या कसमादे पट्ट्यात निर्यातक्षम द्राक्षांच्या मण्यांना तडे जाऊन डाग पडले आहेत. त्यामुळे मालाचा दर्जा तर घसरलाच आहे, मात्र उत्पादनावर मोठा परिणाम होणार आहे. यामुळे सुमारे पाचशे कोटींचा फटका बसू शकतो, असा द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांचा प्राथमिक अंदाज आहे. पाऊस सुरूच असल्याने दिवसेंदिवस नुकसान वाढत आहे. यामुळे शेतकरी मेटाकुटीस आले असून, एकरी उत्पादन खर्चही ४० टक्क्यांनी वाढला आहे. मात्र सतत होणाऱ्या पावसामुळे केलेला खर्चदेखील मातीमोल होत आहे. चालू हंगाम वाया जात असल्याने एवढ्या खर्चाचा परतावा कसा मिळणार, गुंतवलेले पैसे, बँकांचे कर्ज, उसनवारी कशी फेडणार याची चिंता असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. 

त्यामुळे शासनाने तातडीने सर्व्हे आणि पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, तसेच या नुकसानीचा अंतर्भाव हवामानाधारित पीकविमा योजनेत करावा, अशी मागणी द्राक्ष उत्पादक शेतकरी करीत आहेत. चालू वर्षी अतिवृष्टीमुळे नियोजन कोलमडले आहे. डाऊनीसारख्या रोगांच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अतिरिक्त ४० टक्के खर्च करूनही तो वाया गेला. घडकुजसारखी समस्या उद्‍भवल्याने उत्पादकतेवर मोठा परिणाम होईल. शासनाची पिकविम्यात निष्क्रियता दिसून आली आहे. अजून पीकविम्याबाबत शासननिर्णय झालेला नाही. त्यामुळे तातडीने हवामानधारित तपशील घेऊन शेतकऱ्यांना सरसकट मदत द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे कोशाध्यक्ष कैलास भोसले यांनी केली आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com