सोयाबीन पीकविमा घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी

गेल्या हंगामात सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शासनाच्या सर्व्हेक्षणात सुद्धा हे सिद्ध झाले आहे. तरीही शेतकऱ्यांना सोयाबीन पीकविमा मिळालेला नाही.
सोयाबीन पीकविमा घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी Demand for probe into soybean crop insurance scam
सोयाबीन पीकविमा घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी Demand for probe into soybean crop insurance scam

अकोला : गेल्या हंगामात सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शासनाच्या सर्व्हेक्षणात सुद्धा हे सिद्ध झाले आहे. तरीही शेतकऱ्यांना सोयाबीन पीकविमा मिळालेला नाही. या सोयाबीन पीकविमा घोटाळ्याची चौकशी करून शेतकऱ्यांना पैसा द्या, अशी मागणी भारत कृषक समाजाने शासनाकडे केली आहे. या बाबत भारत कृषक समाजाचे महाराष्ट्र चेअरमन डॉ. प्रकाश मानकर यांनी निवेदन दिले. जिल्ह्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणात तक्रारी झाल्यानंतर पीक पाहणी समितीने सगळीकडे घोळ केल्याच्या व प्रत्यक्षात शेतात न जाताच घरी बसून अहवाल तयार केल्याच्या घटना समोर आलेल्या आहेत. एक महिन्यापासून याची चौकशी सुरू असून, ऐन हंगामाच्या वेळीच शेतकऱ्यांना आपल्या हक्काच्या पैशांपासून वंचित राहावे लागत आहे.  विमा कंपन्यांची मुजोरी कोणाच्या भरवशावर सुरू आहे. याचाही शोध घेण्याची वेळ आली आहे. कृषी व महसूल विभागाची भूमिका संशयास्पद आहे. करोडोंचा प्रीमीयम भरल्यावर व ५० टक्क्यांवर नुकसान झाले तरी सुद्धा विमा भेटत नसेल तर भविष्यात शेतकरी या योजनेपासून दूर जातील. तरी या प्रकरणाची चौकशी लवकर पूर्ण करून शेतकऱ्यांना पैसे मिळतील यासाठी उचित कार्यवाही करावी, अशी मागणी डॉ. मानकर यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, विमा अधिकाऱ्यांना पाठविलेल्या निवेदनात केली आहे. अनेक शेतकऱ्यांना विमा नाकारल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये रोष निर्माण झाला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com