पारंपरिक पशू उपचाराला नवतंत्राची जोड द्या: डाॅ. काकोडकर

बायएफ
बायएफ

पुणे ः ग्रामीण भागात आजही जनावरांच्या उपचारासाठी स्थानिक वैदूंची मदत घेतली जाते. औषधी वनस्पतींद्वारे करण्यात येणारे उपचार चांगले आहेत. या पारंपरिक उपचार पद्धतीला नवीन तंत्रज्ञानाची जोड दिली तर उपचार पद्धतीत सुधारणा होईल. त्याचे प्रमाणीकरण होईल, त्याचबरोबरीने ही उपचार पद्धती सर्वांना उपयुक्त ठरेल, असा सल्ला राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाचे अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांनी दिला.   बाएफ संस्था आणि राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाच्या संयुक्त विद्यमाने पारंपरिक पशू औषधी उपचाराची सद्यस्थिती, संधी आणि आव्हाने याविषयी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी प्रमुख  पाहूणे म्हणून डॉ. अनिल काकोडकर यांनी मार्गदर्शन केले. कार्यशाळेला राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाचे सचीव डॉ. अरुण सप्रे, बाएफचे अध्यक्ष गिरीश सोहनी तसेच भरत काकडे, डॉ. अशोक पांडे आणि विविध राज्यांतील पशुतज्ज्ञ उपस्थित होते.  डॉ. काकोडकर म्हणाले, की पारंपरिक उपचार पद्धतींचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करून त्यांचे प्रमाणीकरण करावे. यासाठी ग्रामीण भागात जनावरांवर उपचार करणारे वैदू तसेच पशुतज्ज्ञांच्या समन्वयातून पशू उपचार पद्धतीमध्ये औषधी वनस्पतींचा वापर योग्य पद्धतीने करणे शक्य आहे. यातून स्थानिक पातळीवर कमी खर्चात योग्य उपचार करणे शक्य होईल. परंपरागत उपचार पद्धतींविषयी जगभरातील तज्ज्ञ अभ्यास करत आहेत. यातून नवीन औषधे विकसित होत आहेत. आपणही नवीन तंत्रज्ञानाची जोड परंपरागत उपचार पद्धतीला दिली पाहिजे.  उपस्थितांना मार्गदर्शन करताना गिरीश सोहनी म्हणाले, की आपल्या देशात  पुरातन काळापासून उपचारासाठी औषधी वनस्पतींचा वापर होत आहे. त्यातून आयुर्वेद, युनानी पद्धती विकसित झाल्या. याचबरोबरीने आजही ग्रामीण भागात औषधी वनस्पतींच्या पशू उपचारासाठी वापर करणारे वैदू आहेत. त्यांच्याकडे असलेल्या परंपरागत ज्ञानाचे संकलन आणि अभ्यास करण्यासाठी बाएफने उपक्रम हाती घेतला आहे. वैदू आणि पशुतज्ज्ञांच्या समन्वयातून पशू उपचार पद्धतीचे प्रमाणीकरणही केले आहे. या किफायतशीर उपचार पद्धतीचा फायदाही होताना दिसतो. परंपरागत ज्ञान आणि आधुनिक पशू उपचार पद्धतीची सांगड घालण्याचा आमचा प्रयत्न आहे. या कार्यशाळेमध्ये विविध राज्यातील पशूतज्ज्ञांनी पशू उपचार पद्धतीविषयी अनुभव मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.आवारे यांनी केले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com