ठिबक, तुषार सिंचनाचे अनुदान वाढले ः चलवदे

नांदेड : ‘‘शासनाने ठिबक तसेच तुषार सिंचनासाठी अनुदान वाढविले आहे. या सोबतच खर्चाच्या मापदंडातही वाढ केली आहे. यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ऊस, केळी, हळद पिकास ठिबक व सोयाबीन, हरभरा पिकास तुषार सिंचनाचा वापर करून सर्वाधिक क्षेत्र सुक्ष्म सिंचनाखाली आणावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांनी केले.
Drip, sprinkler irrigation subsidy increased: Chalavade
Drip, sprinkler irrigation subsidy increased: Chalavade

नांदेड : ‘‘शासनाने ठिबक तसेच तुषार सिंचनासाठी अनुदान वाढविले आहे. या सोबतच खर्चाच्या मापदंडातही वाढ केली आहे. यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ऊस, केळी, हळद पिकास ठिबक व सोयाबीन, हरभरा पिकास तुषार सिंचनाचा वापर करून सर्वाधिक क्षेत्र सुक्ष्म सिंचनाखाली आणावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांनी केले.

पंतप्रधान कृषी सिंचन योजना प्रति थेंब अधिक पीक योजनेअंतर्गत सुक्ष्म सिंचन (ठिबक व तुषार सिंचन) या बाबीसाठी लाभ देण्यात येतो. यापूर्वी या योजनेअंतर्गत अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी यांस ५५ टक्के व इतर शेतकऱ्यांना ४५ टक्के खर्च मर्यादेत अनुदान देण्यात येत होते. २०२१-२२ मध्ये केंद्र शासनाने खर्चाच्या मापदंडामध्ये वाढ केली आहे. त्यामुळे अनुदानाच्या रक्कमेतही वाढ झाली आहे. 

२०२१-२२ मध्ये मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेअंतर्गत अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना देय ५५ टक्के अनुदानास पूरक अनुदान २५ टक्के व इतर शेतकऱ्यांना (५ हेक्टरच्या मर्यादेत) देय ४५ टक्के अनुदानास पूरक अनुदान ३० टक्के देय आहे. यामुळे अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना ८० टक्के व इतर शेतकऱ्यांना ७५ टक्के अनुदान मिळेल.

या योजनेअंतर्गत (१.२ बाय ०.६ मीटर लटरल अंतर) सध्या एक हेक्टर ठिबक सिंचनासाठी खर्च मर्यादा एक लाख २७ हजार ५०१ रुपये आहे. २०२१-२२ मधील देय अनुदानात ८० टक्के एक लाख दोन हजार १ रुपये, तर ७५ टक्के ९५ हजार ६२६ रुपये आहे. तर (१.५ बाय ४.५ मीटर लटरल अंतर) मध्ये खर्च मर्यादा ९७ हजार २४५ रुपये आहे. यात २०२१-२२ मध्ये अनुदान ८० टक्के ७७ हजार ७९६ रुपये आणि ७५ टक्के मध्ये ७२ हजार ९३४ रुपये मिळेल. तसेच (पाच बाय पाच मीटर लटरल अंतर) यात खर्च मर्यादा ३९ हजार ३७८ रुपयांनुसार अनुदान ८० टक्केत ३१ हजार ५०२ रुपये, तर ७५ टक्केत २९ हजार ५३३ रुपये मिळेल.

तुषारसाठी असे मिळेल अनुदान

तुषार सिंचन क्षेत्र एक हेक्टरपर्यंत (७५ एमएम) २४ हजार १९४ रुपये मापदंड मंजूर आहे. यानुसार ८० टक्के अनुदान १९ हजार ३५५, तर ७५ टक्केनुसार १८ हजार १४५ रुपये अनुदान मिळेल. दोन हेक्टरच्या मर्यादेत (७५ एमएम) ३४ हजार ६५७ रुपये खर्चाच्या मापदंडानुसार ८० टक्के अनुदान २७ हजार ७२५, तर ७५ टक्क्यानुसार २५ हजार ९९२ टक्के अनुदान मिळेल, अशी माहिती चलवदे यांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com