तापमानात घट; द्राक्ष मण्यांना तडे 

रविवारी (ता.२३) रोजी सकाळपासूनच धुके आणि धुळीचे कण एकत्र असे वातावरण दिवसभर होते.त्यातच गारठा वाढत तापमानात घसरण झाली.
 तापमानात घट; द्राक्ष मण्यांना तडे 
Drop in temperature; Crack the grape beads

नाशिक : रविवारी (ता.२३) रोजी सकाळपासूनच धुके आणि धुळीचे कण एकत्र असे वातावरण दिवसभर होते.त्यातच गारठा वाढत तापमानात घसरण झाली. परिणामी त्याचा द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर फटका बसत आहे. द्राक्ष मण्यांची फुगवण, साखर उतरण्याची अडचण यासह  काही ठिकाणी तडे जण्याची समस्या वाढल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. 

        वाहणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे तापमानात घसरण होऊन निफाड येथील गहू संशोधन केंद्रात सोमवारी (ता.२४) रोजी ५.५ अंश सेल्सिअस निच्चांकी तापमानाची नोंद झाली. मात्र सूर्याने दर्शन दिल्याने वातावरण स्वच्छ होते. मात्र सकाळी पडणारे दव आणि धुके तसेच दुपारी पडणाऱ्या उन्हाच्या चटक्यामुळे द्राक्ष मण्यांवर बर्निंग आणि उकड्या यांचा प्रादुर्भाव वाढला असल्याचे वडनेर भैरव (ता. चांदवड) येथील द्राक्ष उत्पादक शेतकरी बापू साळुंके यांनी कळविले आहे. 

काढणीस तयार होत असलेल्या बागांमध्ये साखरेचे प्रमाण पुन्हा कमी होत आहे. त्यामुळे घड हिरवे दिसून काढणी लांबणीवर जात आहेत. वेलींमध्ये ताण निर्माण झाल्याने द्राक्ष मण्यांच्या फुगवणीवर मोठा परिणाम जाणवत आहे. पुढील ४ ते ५ दिवस चांगली थंडी राहील. त्यामुळे सिंचन व्यवस्थापन करताना पूर्ण क्षणतेने दिले जावे. ज्या द्राक्षांमध्ये १४ ते १५ ब्रिक्स दरम्यान साखर पातळी आहे, त्यांना केसासारखे तडे जाण्याची समस्या येत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.           कांदा, गहू, हरभरा या पिकांसाठी सध्याचे वातावरण अनुकूल आहे. मात्र ढगाळ वातावरणामुळे उन्हाळ कांद्याचे नुकसान होऊन पीक संरक्षणाचा अतिरिक्त पीक संरक्षण खर्च वाढत आहे. तापमानात चढ उतार होत असल्याने त्याचा पिकांवर परिणाम होत आहे. कांद्यावर बुरशीजन्य रोगांसह पात पिवळी पडत आहे. तर थ्रीप्स व करपा रोगाचा पिकांना फटका आहे. भाजीपाला पिकांचे नुकसान होत आहे. जिल्ह्याच्या पश्चिम भागातील आंबा लागवड क्षेत्रात मोहर झडत असल्याची स्थिती आहे.        

मजुरांची कामावर दांडी  हवेत गारवा असल्याने थंडीचा कडाका वाढला आहे. त्यामुळे मानवी आरोग्यावर त्याचा परिणाम होत आहे. त्यामुळे अनेकांना हुडहुडी भरल्याने शेतीकामात अडचणी येत आहेत. काही ठिकाणी मजूर कामावरच आले नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे मजूर टंचाई असताना लांबणीवर गेलेल्या कामांमध्ये थंडीमुळे व्यत्यय येत असल्याची स्थिती आहे. थंडीमुळे शेतीच्या कामासाठी मजूर गैरहजर असल्याचे वडगाव (ता. सिन्नर) येथील शेतकरी भागवत बलक यांनी सांगितले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com