सततच्या पावसामुळे  रिसोडमध्ये सोयाबीन संकटात 

तालुक्यात २० सप्टेंबरपासून सतत पाऊस पडत असल्याने काढणीला आलेले सोयाबीन पीक संकटात सापडले आहे. त्यामुळे यंदाही मागील वर्षासारखी पिकाची नासाडी होण्याची शक्यताआहे.
सततच्या पावसामुळे  रिसोडमध्ये सोयाबीन संकटात  Due to continuous rain Soybean crisis in Risod
सततच्या पावसामुळे  रिसोडमध्ये सोयाबीन संकटात  Due to continuous rain Soybean crisis in Risod

रिसोड, जि. वाशीम : तालुक्यात २० सप्टेंबरपासून सतत पाऊस पडत असल्याने काढणीला आलेले सोयाबीन पीक संकटात सापडले आहे. त्यामुळे यंदाही मागील वर्षासारखी पिकाची नासाडी होण्याची शक्यता निर्माण झाली असल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. पेरणीचा खर्चही निघणे कठीण झालेले असल्याचे काही शेतकरी सांगत आहेत.  जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पेरणी केलेले सोयाबीन सध्या काढणीला आले असून, काही ठिकाणी सोयाबीन सोंगणीचे काम सुरू झालेले आहे. परंतु ऐन काढणीच्या हंगामात गेल्या तीन दिवसांपासून सतत सुरू असलेल्या पावसामुळे व शेतात पाणी साचल्यामुळे काढणीला आलेले सोयाबीन खराब होण्याच्या मार्गावर आहे. मागील वर्षीही काढणीच्या हंगामात पावसाने धुमाकूळ घातल्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. मे महिन्याच्या शेवटी व जून महिन्यात सोयाबीनच्या भावाने दहा हजारांचा टप्पा गाठला होता. यंदा तालुक्यात सोयाबीनचा पेरा मोठ्या प्रमाणात असून, सोयाबीनची पीकही चांगले आले आहेत. भावही चांगला मिळणार असल्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. परंतु पावसाने धुमाकूळ घातल्यामुळे काढणीला आलेले पीक संकटात सापडले आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. 

प्रतिक्रिया

मागील वर्षीप्रमाणे यंदाही सोयाबीन काढणीला सुरुवात होताच पाऊस धुमाकूळ घालत आहे. हातातोंडाशी आलेले सोयाबीन खराब झाले आहे. काही शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाचा विमा काढला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीबाबत काही तासांत संबंधित कंपनीला कळवायचे असते. परंतु ग्रामीण भागात भ्रमणध्वनीमध्ये प्रचंड अडचणी येत आहेत. त्यामुळे शेतकरी अगदी मेटाकुटीस आलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सरसकट पीकविमा द्यावा अशी, मागणी राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली आहे.  -घनश्याम मापारी, सचिव, सरपंच संघटना, रिसोड  प्रतिक्रिया

दहा एकरांमधील सोयाबीन काढणीला आले आहे. दोन एकर सोयाबीनची काढणी झाली आहे. पावसामुळे शेतात पाणी साचले आहे. पावसाने उघडीप दिली नाही, तर उपटून ठेवलेले सोयाबीनही खराब होणार आहे.  -बद्री रंजवे, शेतकरी, भोकरखेडा  

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com