`रानभाज्या खा, रोगप्रतिकार शक्ती वाढवा`

सोलापूर : रानभाज्या खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते. रक्ताभिसरण व्यवस्थित होते. तर, काही भाज्या मधुमेह, हृदयविकारावरही उपयुक्त आहेत. याचा रोजच्या आहारात वापर करण्याचे आवाहन मान्यवरांनी केले.
 `Eat Vegetables, boost immunity`
`Eat Vegetables, boost immunity`

सोलापूर : माहिती असलेल्या पालेभाज्या, फळभाज्या आपण खातो, पण बांबूच्या कोवळ्या पानांची, सराटा, केनपाट, इचका, पिंपळ पान, भुई आवळी या रानभाज्यांचीही भाजी होते, हे माहिती नसते. रानभाज्या खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते. रक्ताभिसरण व्यवस्थित होते. तर, काही भाज्या मधुमेह, हृदयविकारावरही उपयुक्त आहेत. याचा रोजच्या आहारात वापर करण्याचे आवाहन मान्यवरांनी केले.

नेहरूनगर शासकीय मैदानात राज्य शासनाच्या कृषी विभाग आणि कृषि तंत्रज्ञान व्यवस्थान यंत्रणेच्या वतीने (आत्मा) रानभाज्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. यावेळी आमदार सुभाष देशमुख, उपमहापौर राजेश काळे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, ‘सकाळ’चे सहयोगी संपादक अभय दिवाणजी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार, उपसंचालक रवींद्र माने, ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक मदन मुकणे, कोरडवाहू कृषी संशोधन केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. विजय अमृतसागर आदींसह शेतकरी उपस्थित होते. 

आमदार देशमुख यांनी रानभाज्या महोत्सव आयोजित केल्याबद्दल कृषी विभागाचे कौतुक केले. हा स्तुत्य उपक्रम असून कोरोना संकटावर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासन स्वत:चा जीव धोक्यात घालून काम करीत असल्याबद्दल त्यांनी कौतुक केले. रानभाज्यासाठी सोलापूर ब्रँड व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. शंभरकर म्हणाले, ‘‘कोरोना महामारीच्या काळात रोगप्रतिकारशक्ती वाढविणे गरजेचे आहे. रानभाज्या आयुर्वेदिक औषधाचे काम करतात. जिल्ह्यातील कोरोना सध्या नियंत्रणात आला आहे. या महोत्सवातून रानभाज्या उत्पादक शेतकऱ्यांना फायदा व्हावा, नागरिकांनी सुरक्षित अंतर ठेवून भाज्या खरेदी करावी, असे आवाहन त्यांनी केले.

दिवाणजी म्हणाले, ‘‘फास्टफूडच्या जमान्यात युवा पिढीला रानभाज्यांचे महत्व पटवून देण्याची गरज आहे. आरोग्यासाठी रानभाज्या खाणे महत्वाचे आहे.’’ रानभाजी माहिती पुस्तिकेचे प्रकाशनही करण्यात आले.

विविध प्रकारच्या रानभाज्या

या महोत्सवात चुका भाजी, अंबाडी, गुळवेल, चिघळ, शेवगा पाला, उंबर, पाथरी, कडवंची, तांदुळजा, हादगा, आघाडा, अळू, इचका, टाकळा, चंदन बटवा, करडई आणि कुरडू या रानभाज्या विक्रीसाठी ठेवण्यात आल्या होत्या. रानभाज्यांचे आरोग्यासाठी असलेल्या उपयोगाची सचित्र माहिती प्रदर्शनात मांडण्यात आली आहे. नागरिकांनी त्याला चांगला प्रतिसाद दिला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com