सोलापूर जिल्हा दूध संघासाठी २६ फेब्रुवारीला निवडणूक

सोलापूर ः सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघाच्या (दूध पंढरी) संचालक मंडळाच्या १७ जागांसाठी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून, शुक्रवारी (ता. २१) जानेवारीपासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात करण्यात आली.
 Election for Solapur District Milk Association on 26th February
Election for Solapur District Milk Association on 26th February

सोलापूर ः सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघाच्या (दूध पंढरी) संचालक मंडळाच्या १७ जागांसाठी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून, शुक्रवारी (ता. २१) जानेवारीपासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात करण्यात आली. येत्या २६ फेब्रुवारीला मतदान आणि २७ फेब्रुवारीला दुसऱ्या दिवशी मतमोजणी होणार आहे.

सहकारी संस्थांचे जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडणूक कार्यक्रमानुसार २१ जानेवारी ते २८ जानेवारीपर्यंत इच्छुकांना उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. ३१ जानेवारीला उमेदवारी अर्जांची छाननी होईल. उमेदवारी मागे घेण्यासाठी १ फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारीपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर २६ फेब्रुवारीला मतदान आणि २७ फेब्रुवारीला मतमोजणी होऊन निकाल घोषित होईल.

संघाच्या १७ संचालकांसाठी ही निवडणूक होईल. त्यात संस्था मतदारसंघातून १२ संचालक निवडले जातील. महिला प्रतिनिधीमधून दोन, अनुसूचित जाती-जमातीमधून एक, इतर मागास प्रवर्गातून एक, भटक्या जाती-जमातीवर्गातून एक या प्रमाणे १७ संचालकांची निवड होईल.

दिग्गज नेते आमने-सामने

या निवडणुकीतील मतदानासाठी आधी ९५७ संस्थांचे ठराव आले होते. पण त्यातून केवळ ३१६ संस्थांच मतदार म्हणून पात्र ठरल्या आहेत. त्यात सर्वाधिक ७२ संस्था मंगळवेढ्यातील आहेत. मोहोळमधून ४७ संस्थांचा समावेश आहे. 

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com