सोलापूर जिल्ह्यात चार हजार कृषिपंपांना वीज

Electricity to four thousand agricultural pumps in Solapur district
Electricity to four thousand agricultural pumps in Solapur district

सोलापूर : महावितरणच्या बारामती परिमंडलमध्ये उच्चदाब वितरण प्रणालीद्वारे (एचव्हीडीएस) कृषिपंपांना नवीन वीजजोडणी देण्याचे काम सुरू आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत चार हजार ७७३ कृषिपंपांना नवीन वीजजोडणी देण्याच्या यंत्रणेची उभारणी पूर्ण झाली आहे. त्यापैकी तीन हजार ९०९ कृषिपंपांची वीजजोडणी कार्यान्वित करण्यात आली आहे. 

‘एचव्हीडीएस''द्वारे सोलापूर व सातारा जिल्हा तसेच बारामती मंडलमध्ये स्वतंत्र रोहित्रांसह नवीन वीजयंत्रणा उभारून सद्यःस्थितीत १२ हजार ३७२ कृषी पंपांना नवीन वीजजोडणी देण्याचे काम पूर्ण झाले आहे. आतापर्यंत सातारा जिल्ह्यात तीन हजार ५०२, सोलापूर जिल्ह्यात तीन हजार ९०९, बारामती मंडलमधील तीन हजार २०८ अशा एकूण १० हजार ६१९ कृषिपंपांची नवीन वीजजोडणी ‘एचव्हीडीएस''द्वारे कार्यान्वित केली आहे. 

जिल्ह्यातील सोलापूर शहर व ग्रामीण, अकलूज, पंढरपूर, बार्शी या पाच विभागांतर्गत मार्च २०१८ अखेर पैसे भरून प्रलंबित असणाऱ्या आठ हजार ४३८ कृषिपंपांना ‘एचव्हीडीएस''द्वारे नवीन वीजजोडणी देण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत चार हजार ७७३ रोहित्रांसह वीजयंत्रणा उभारण्याचे काम पूर्ण झाले आहे. तीन हजार ९०९ कृषिपंपांची वीजजोडणी कार्यान्वित केली आहे.

योग्य दाबाने वीजपुरवठा 

एचव्हीडीएसमधून प्रत्येक रोहित्रावर एक किंवा दोन कृषिपंपांचा वीजपुरवठा आहे. त्यामुळे रोहित्र जळण्याचे प्रमाण नगण्य होईल. कृषिपंपधारकांनी विद्युतभाराच्या मागणीनुसार रोहित्रांची क्षमता ठरविण्यात येत आहे. या प्रणालीत १० केव्हीए, १६ केव्हीए व २५ केव्हीए क्षमतेचे रोहित्र वापरण्यात येत आहेत. उच्चदाब वाहिनी ही ग्राहकाच्या विहिरीपर्यंत उभारण्यात येत असल्याने लघुदाब वाहिनी विरहित वीजजोडणी राहणार आहे. त्यामुळे कृषिपंपांना योग्य दाबाने वीजपुरवठा होणार आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com