उपयुक्त डिजिटल तंत्रज्ञानाच्या संशोधनावर भर द्या ः डॉ. ढवण

Emphasis on research on useful digital technologies:  Dr. Dhawan
Emphasis on research on useful digital technologies: Dr. Dhawan

परभणी : ‘‘डिजिटल शेती तंत्रज्ञानाचा मराठवाड्यातील शेतकऱ्यांना अधिकाधिक लाभ होण्यासाठी संशोधक, प्राध्यापकांनी उपयुक्त संशोधनावर भर देण्याची गरज आहे,’’ असे प्रतिपादन कुलगुरु डॉ. अशोक ढवण यांनी केले. 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील प्रगत कृषी विज्ञान व तंत्रज्ञान केंद्रातर्फे राष्‍ट्रीय कृषी उच्‍च शिक्षण प्रकल्‍पांतर्गत शुक्रवार (ता.१३) ते रविवार (ता.१५) या कालावधीत कार्यशाळा घेण्यात आली. अध्यक्षस्थानी कुलगुरु डॉ. ढवण बोलत होते. सिंगापूर येथील जागतिक विद्यापीठाचे प्रा डॉ. दिपक वाईकर, सुरत येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. अजय देशमुख, पुणे येथील अभियांत्रिकी महाविद्यालयातील यांत्रिकी विभागाचे प्रा. डॉ. सुरेश ओहोळ, कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता डॉ. उदय खोडके, प्रकल्‍प प्रमुख डॉ. गोपाल शिंदे उपस्थित होते. 

इचलकरंजी येथील न्‍युजेनीक्‍स इन्फोटीक्‍सचे आदित्‍य मराठे, पुणे येथील नेल इन्‍फोटेकच्या शितल जाधव, पुणे येथील अॅसअॅप अॅग्रीटेकचे अजित खरजुले यांनी प्रशिक्षणार्थ्‍यींना रोबोटीक्‍स, मानवाशी संवाद साधणाऱ्या चॅटबॉटचे व पिकावर फवारणी करणाऱ्या ड्रोनचे प्रात्‍यक्षिक दाखवले. डिजिटल यंत्र निर्मिती करणारे संभाजी शिराळे, सलीम पठाण, कुशल ग्रामीण उद्योजकांनी सोलार फवारणी यंत्र, झाडावरील फळे तोडणारा रोबोट व पवनचक्‍कीव्‍दारे उर्जा निर्मितीचे सादरीकरण केले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com