To the employees of the saline belt ‘Pokra’ will give zero cultivation technique
To the employees of the saline belt ‘Pokra’ will give zero cultivation technique

खारपाण पट्ट्यातील कर्मचाऱ्यांना ‘पोकरा’ देणार शून्य मशागतीचे तंत्र

पोकरा प्रकल्पाच्या सहकार्याने खारपाण पट्ट्याच्या कार्यक्षेत्रात काम करीत असलेल्या कृषी विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना शून्य मशागत तंत्रज्ञान दिले जाणार आहे.

अकोला ः राज्यात नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाची अंमलबजावणी केली जात आहे. या प्रकल्पाच्या कार्यक्षेत्रात काही भाग खारपाण पट्ट्याचा आहे. या भागातील शेती पद्धतीने व इतर भागांतील शेतीचे व्यवस्थापन भिन्न आहे. आता पोकरा प्रकल्पाच्या सहकार्याने खारपाण पट्ट्याच्या कार्यक्षेत्रात काम करीत असलेल्या कृषी विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना शून्य मशागत तंत्रज्ञान दिले जाणार आहे. यासाठी सगुणाबाग नेरळ येथे गुरुवार (ता.१७) आणि शुक्रवार (ता.१८) अशी दोन दिवसांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.  या प्रकल्पांतर्गत शून्य मशागत तंत्रज्ञान अवलंबण्यास प्रोत्साहन हा घटक समाविष्ट केलेला आहे. त्यामुळे जिल्हा व उपविभाग स्तरावरील अधिकारी, कर्मचाऱ्यांची क्षमतावृद्धी करण्याच्या उद्देशाने दोन दिवसांचे निवासी प्रशिक्षण दिले जाणार आहे. खारपाण पट्ट्यातील जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी शून्य मशागत तंत्रज्ञान उपयुक्त असून, या तंत्राचा प्रसार करणे आवश्‍यक आहे.  कृषिमंत्री दादा भुसे यांनीही १९ जानेवारीला घेतलेल्या बैठकीत खारपाण पट्ट्याच्या अनुषंगाने विशेष प्रयत्न करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यांच्या सूचनेनुसार आयोजित दोनदिवसीय कार्यशाळेत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे सेवानिवृत्त शास्त्रज्ञ डॉ. सुभाष ताले, शून्य मशागत तंत्रातील तज्ज्ञ, प्रगतिशील शेतकरी प्रताप चिपळूणकर मार्गदर्शन करतील. अकोला, अमरावती, बुलडाणा या जिल्ह्यांचे जिल्हा अधीक्षक, तसेच जिल्ह्यातील उपविभागीय कृषी अधिकारी सहभागी होतील.    

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com