पेट्रोलमध्ये इथेनॉलचे मिश्रण  ८.१ टक्के पर्यंत वाढले 

गेल्या वर्षांमध्ये (२०२०- २१) देशात पेट्रोलमध्ये इथेनॉलचे मिश्रण करण्याचे प्रमाण ८.१ टक्क्यांपर्यंत वाढले आहे. २०१९-२० मध्ये ते ५ टक्के इतके होते.
 पेट्रोलमध्ये इथेनॉलचे मिश्रण  ८.१ टक्के पर्यंत वाढले 
ethanol mixture with petrol 8.1 wadle till a pound

कोल्हापूर : गेल्या वर्षांमध्ये (२०२०- २१) देशात पेट्रोलमध्ये इथेनॉलचे मिश्रण करण्याचे प्रमाण ८.१ टक्क्यांपर्यंत वाढले आहे. २०१९-२० मध्ये ते ५ टक्के इतके होते. 

इथेनॉल उद्योगातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देशाचे तेल आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी परिवहन क्षेत्रातील जैवइंधनाचा वाटा वाढवण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. पेट्रोलमध्ये मिश्रण इथेनॉल १० टक्के पर्यंत झाल्यास तेल आयात १.५ टक्क्यांनी कमी होऊ शकते. जसजसा इथेनॉलचा अधिक पुरवठा उपलब्ध होईल, तसतसे मिश्रणाचे प्रमाण वाढत जाणार आहे. देशात इथेनॉल मिश्रणाचा प्रायोगिक वापर करून सुमारे दोन दशके झाली आहेत. मर्यादित पुरवठा ही सर्वात मोठी अडचण होती. सरकारने एक सहाय्यक धोरण व्यवस्था देऊन याचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला आहे. केंद्र सरकार गेल्या काही वर्षापासून इथेनॉल निर्मिती बाबत अधिक गंभीर बनले आहे. या अंतर्गत केंद्राने इथेनॉल तयार करण्यासाठी विविध सवलती साखर उद्योगासह अन्य उद्योगांना दिले आहेत. त्यामध्ये कर्ज पुरवठ्याची काही अन्य सवलतींचा ही समावेश आहे. साखर, साखरेचा पाक, अतिरिक्त तांदूळ आणि मका यांचा वापर करुन इथेनॉल तयार करण्यासाठी केंद्र सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे. इथेनॉल निर्मितीसाठी पूर्वी उसाचा जास्तीत जास्त वापर व्हायचा परंतु केंद्राने इथेनॉल तयार करण्यासाठी अन्य धान्यांचाही समावेश केल्याने इथेनॉलचे उत्पादन इतर अनेक राज्यांमध्ये नेण्यास मदत झाली आहे. पूर्वी ते बहुतांशी उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि कर्नाटकापुरते मर्यादित होते, ज्यात उसाचे मोठे पीक होते. २०१३-१४ या वर्षात केवळ १.५ टक्के इथेनॉलचे मिश्रण पेट्रोलमध्ये केले जायचे. प्रत्येक वर्षी यात वाढ होत आता हे प्रमाण ८.१ टक्‍क्‍यांपर्यंत पोचले आहे. मोलॅसिस-आधारित इथेनॉल उत्पादन सुविधा वाढवल्या. २०१६-१७ मध्ये वार्षिक २२८ कोटी लिटरवर इथेनॉल होत होते. आता ५२० कोटी लीटरपर्यंत वाढले आहे. इथेनॉल खरेदीची निविदा परिस्थिती, अनुकूल वाहतूक दर आणि सुरक्षा ठेवीतील कपात यामुळे डिस्टिलर्सना मोठा आत्मविश्वास मिळाला आहे.  २०२५पर्यंत मिश्रणाचे प्रमाण २० टक्केपर्यंत नेण्यासाठी इथेनॉल उत्पादनाला आणखी चालना देण्याचे भारताचे उद्दिष्ट आहे. हे सुलभ करण्यासाठी, डिस्टिलरीज, तसेच तेल विपणन कंपन्यांना अतिरिक्त स्टोरेज तयार करणे आवश्यक असल्याचे इस्माच्या सूत्रांनी संगितले. 

इथेनॉल मिश्रणावर दृष्टिक्षेप  २०२०-२१मध्ये पेट्रोलमध्ये इथेनॉलचे मिश्रण ८.१ टक्क्यांपर्यंत वाढले  २०१९-२० मध्ये ते ५ टक्के इतके होते  इथेनॉल उत्पादन उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटकापुरते मर्यादित होते  २०१३-१४ या वर्षात केवळ १.५ टक्के इथेनॉलचे मिश्रण केले जायचे  २०१६-१७ मध्ये वार्षिक इथेनॉल उत्पादन २२८ कोटी लिटरवर होते  आता ५२० कोटी लीटरपर्यंत वाढले आहे  २०२५पर्यंत मिश्रणाचे प्रमाण २० टक्केपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट  पेट्रोलमध्ये मिश्रण इथेनॉल १० टक्क्यांपर्यंत झाल्यास तेल आयात १.५ टक्क्यांनी कमी होऊ शकते

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.