नांदेडमध्ये अतिवृष्टिधारकांना नुकसानभरपाईची प्रतीक्षाच

नांदेड : मागील वर्षीच्या खरीप हंगामादरम्यान अतिवृष्टीमुळे शेतीपिकांसह फळबाग व बागायती पिकांचे नुकसान झाले.
Excessive rainfall in Nanded Just waiting for compensation
Excessive rainfall in Nanded Just waiting for compensation

नांदेड : मागील वर्षीच्या खरीप हंगामादरम्यान अतिवृष्टीमुळे शेतीपिकांसह फळबाग व बागायती पिकांचे नुकसान झाले. यासाठी शेतकऱ्यांना भरपाई देण्यासाठी शासनाकडून दोन टप्प्यांत ५६५ कोटी १३ लाख रुपयांचा निधी मिळाला होता. ही भरपाई वाटपाचे काम जिल्हा बॅंकेकडे सोपविण्यात आले. परंतु नियोजन्यशुन्य कारभारामुळे पेरणी जवळ येऊनही शेतकऱ्यांना भरपाई मिळाली नाही. त्यामुळे पेरणीच्या तोंडावर शेतकरी अडचणीत आले आहेत.

बागायती व फळपिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले होते. यात पहिला हप्ता १६ नोव्हेंबर २०२० रोजी २८२ कोटी ५६ लाख, तर १० जानेवारी २०२१ रोजी दुसऱ्या हप्त्यात २८२ कोटी ५६ लाख रुपये प्राप्त झाले. जिल्हा प्रशासनाने लगेच तहसिलच्या माध्यमातून जिल्हा बॅंकेकडे निधी वितरित केला. यात पहिल्या हप्त्यातील अर्धी रक्कम शेतकऱ्यांना वितरित करण्याचे नियोजन होते. परंतु बॅंकेने अपूऱ्या‍या कर्मचाऱ्यांमुळे वाटपाचे काम अंत्यत संथ गतीने केले. 

दरम्यान, दुसरा हप्ता प्राप्त झाल्यानंतर दोन्ही हप्ते एकाचवेळी वाटपाचे नियोजन ठरले. परंतु आजही अनेक गावातील शेतकऱ्यांना एकही हप्ता मिळाला नाही. शाखा स्तरावर अपुरे कर्मचारी, वाटपाच्या कामातील दिरंगाईमुळे शेतकऱ्यांना सहा महिन्यापेक्षा अधिक काळापासून चकरा माराव्या लागत आहेत. 

पेरणीसाठी पैशांची गरज

प्रत्येकवेळी वाटप पूर्ण होत आल्याची माहिती बॅंकेकडून देण्यात आली. शाखा स्तरावरून व्यवस्थापनाला वाटपाबाबत चुकीची माहिती पुरविल्यामुळे शेतकरी भरपाईपासून वंचित राहिले आहेत. सध्या पेरणीसाठी पैसे हवे आहेत. मात्र पैसे मिळायला अजून दहा-पंधरा दिवस लागतील, असे उत्तर शेतकऱ्यांना मिळत आहे.

शाखेत कर्मचाऱ्यांची कमतरता तसेच नियमित कामामुळे अनुदान वाटपाला वेळ लागत आहे. आजपर्यंत ८० टक्क्यांनुसार ४५५ कोटींचे वाटप झाले आहे. उर्वरित ११० कोटींचे वाटप कोणत्याही परिस्थितीत ३१ मेपर्यंत पूर्ण करण्याचे शाखाधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. - एम. टी. शिंदे, उपसरव्यवस्थापक, जिल्हा बॅंक, नांदेड.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com