धान खरेदीला मुदतवाढ द्या, अन्यथा आंदोलन

गडचिरोली : शासकीय आधारभूत केंद्रांवर धान विक्रीची मुदत येत्या चार दिवसात संपणार आहे. परंतु अद्यापही अनेक शेतकऱ्यांना धान्य विक्री करता आली नाही. त्यामुळे धान खरेदीला मुदतवाढ द्यावी. अन्यथा, आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
धान खरेदीला मुदतवाढ द्या, अन्यथा आंदोलन
Extend the purchase of paddy, otherwise agitation

गडचिरोली : शासकीय आधारभूत केंद्रांवर धान विक्रीची मुदत येत्या चार दिवसात  संपणार आहे. परंतु अद्यापही अनेक शेतकऱ्यांना धान्य विक्री करता आली नाही. त्यामुळे धान खरेदीला मुदतवाढ द्यावी. अन्यथा, आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. 

अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांना पाठविलेल्या निवेदनातून हा इशारा देण्यात आला. निवेदनानुसार, ई-पीक नोंदणीसाठी शासनाने मुदतवाढ दिली. त्यामुळे वंचित शेतकऱ्यांनी धान केंद्रावर उशिरा नोंदणी केली. दरम्यान, काही दिवसांपूर्वी अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे आधारभूत धान खरेदी केंद्र बंद होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे धान केंद्रावर पडून आहे.

अशातच सोमवारी (ता.३१) हमीभावाने धान खरेदीची मुदत संपणार आहे. त्यामुळे हजारो शेतकरी धान विक्रीपासून वंचित राहतील. शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट वाढणार आहे. शेतकऱ्यांना कवडीमोल भावाने धानाची विक्री करावी लागणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होईल, असे निवेदनात नमूद केले आहे. 

आधारभूत धान खरेदीची मुदत ३१ मेपर्यंत वाढवावी, अशी मागणी घोट येथील सामाजिक कार्यकर्ते अरुण अध्येंकीवार यांनी केली. धान खरेदी केंद्र दरवर्षी प्रमाणे एक ऑक्टोबरला सुरू होते. मात्र, केंद्र अडीच महिने विलंबाने सुरू झाले, असे ते म्हणाले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.