कडधान्य आयातीला मुदतवाढ कुणासाठी?

किरकोळ बाजारात तूर, मूग, उडीद डाळींचे दर गतवर्षीच्या तुलनेत कमी झाले असून, बाजार समित्यांतील दरही हमीभावापेक्षा कमीच आहेत. तरीही सरकारने आयातीला मुदतवाढ दिली आहे.
कडधान्य आयातीला मुदतवाढ कुणासाठी?
Extension of cereal imports for whom?

पुणे ः किरकोळ बाजारात तूर, मूग, उडीद डाळींचे दर गतवर्षीच्या तुलनेत कमी झाले असून, बाजार समित्यांतील दरही हमीभावापेक्षा कमीच आहेत. तरीही सरकारने आयातीला मुदतवाढ दिली आहे. या निर्णयाचा तूर बाजारावर परिणाम होण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे. 

कडधान्यामधील तेजी कमी करण्यासाठी आणि ग्राहकांना दिलासा देण्यासाठी तूर, मगी आणि उडीद आयाताली मदतवाढ दिल्याचे म्हटले जात आहे. मात्र या तीनही कडधान्यांचे दर देशांतर्गत बाजारात हमीभावाच्या कमीच आहेत. शेतकऱ्यांची तूर आता कुठे बाजारात येत आहे. दराचा विचार केला, तर सध्या डाळींचे दर मागील वर्षीच्या तुलनेत कमीच आहेत. २१ डिसेंबर २०२१ ला तुरीचे दर १०२.७८ रुपये प्रतिकिलोवर होते, ते मागील वर्षी याच काळात १०५.१४ रुपये होते. म्हणजेच तुरीचे दर मागील वर्षीच्या तुलनेत २.३६ रुपयांनी कमी झाले आहे. मुगाचे दर मागील वर्षी १०४.९३ रुपये प्रतिकिलोवर होते, ते सध्या १०१.३८ रुपयांवर आले आहेत. मागील वर्षी उडीदडाळ १०७.९४ रुपये प्रतिकिलोने मिळत होती, ते दर १०६.३४ रुपयांवर आले आहेत. म्हणजेच तूर, मूग आणि उडीदडाळींचे दर गेल्या वर्षीच्या तुलनेत कमीच आहेत. बाजार समित्यांतही दर हमीभावापेक्षा कमीच आहेत. 

कंटेनर्सची कमतरता असल्याने कडधान्य आयातीत अडथळे निर्माण होत असल्याने इंडिया पल्सेस अॅन्ड ग्रेन्स असोसिएशनने म्हणजेच आयपीजीएने आयातीला मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. सध्या देशात कडधान्याचे दर हमीभावापेक्षा कमी आहेत. आफ्रिकी देशांत कडधान्याचा केवळ २५ ते ५० हजार टन साठा उपलब्ध आहे. तसेच यंदा बर्मा देशात ५ ते ६ लाख टन उडीद उत्पादन होण्याचा अंदाज आहे. तसेच मुदतवाढीने म्यानमारमधून देशात तूर आयात वाढेल, असेही आयपीजीएने म्हटले आहे. 

म्यानमारमधून सरकारच्या निर्णयाचे स्वागत केंद्र सरकारने तूर, मूग आणि उडीद आयातीचा कालावधी वाढविण्याच्या निर्णयावर टीका होत आहे. मात्र निर्यातदार देशांनी सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. म्यानमार येथील ओवरसीज अॅग्रो ट्रेडर्स असोसिएशनने आयातीचा कालावधी वाढविण्याच्या सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले. भारत सरकारच्या या निर्णयामुळे दोन्ही देशांतील संबंध आणखी सुधारतील, असे या असोसिएशनने म्हटले आहे. मागील अनेक वर्षांपासून कडधान्य आयातीचे धोरण वेळोवेळी बदलण्यात आले होते. मात्र आता भारत सरकारने आयात धोरण सुरळीत ठेवल्याने येथील व्यापारी आणि शेतकऱ्यांकडून सरकारच्या भूमिकेचे स्वागत होत आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com