कर्जमाफीअंतर्गत ‘ओटीएस’ला ३१ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

सोलापूर  ः छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना (कर्जमाफी)अंतर्गत असलेल्या एकरकमी कर्ज परतफेड योजनेला (ओटीएस) ३१ ऑक्टोबर २०१९ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. मागील निर्णयानुसार ३० जून २०१९ला त्याची मुदत संपणार होती; परंतु शेतकऱ्यांची संख्या पाहता, त्याला आणखी मुदतवाढ देण्याची आवश्यकता असल्याचे मत नोंदवत राज्य शासनाने त्याला आणखी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसह शेतीकर्जे देणाऱ्या इतर सर्व बँकांना हा निर्णय लागू झाला आहे.

एकूण थकबाकीच्या दीड लाख मर्यादेत शेतकरी कर्जमाफी देण्यात आली. उर्वरित रकमेसाठी ''ओटीएस'' योजना दिली. त्याला अद्यापही फारसा प्रतिसाद नाही. सरसकट कर्जमाफी होईल, असेच शेतकऱ्यांना वाटते. त्यामुळे बँकांकडे शेतीकर्जे मोठ्या प्रमाणात थकीत राहिली आहेत. शिवाय दुष्काळाच्या आपत्तीने शेतकरीही अडचणीत आहेत. त्यामुळे आता पुन्हा मुदतवाढ देऊनही कितपत प्रतिसाद मिळतो, याबाबत शंकाच आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com