परजिल्ह्यातील कारखान्यांची खानदेशातील उसावर नजर

जळगावः खानदेशात उसाचे क्षेत्र यंदा बऱ्यापैकी आहे. त्यातच कारखान्यांची संख्या खानदेशात वाढत आहे. यात आपल्याला उसाची टंचाई भासू नये, यासाठी खानदेशातील कारखान्यांतर्फे उत्पादकांसोबत बैठका घेतल्या जात आहेत.
Of factories in the district A look at the sugarcane in Khandesh
Of factories in the district A look at the sugarcane in Khandesh

जळगाव ः खानदेशात उसाचे क्षेत्र यंदा बऱ्यापैकी आहे. त्यातच कारखान्यांची संख्या खानदेशात वाढत आहे. यात आपल्याला उसाची टंचाई भासू नये, यासाठी खानदेशातील कारखान्यांतर्फे उत्पादकांसोबत बैठका घेतल्या जात आहेत. गाळपाची तयारी यापूर्वीच करण्यात आली आहे. आता थेट उत्पादकांच्या गाठीभेटी घेतल्या जात आहेत.

याशइवाय नाशिक व औरंगाबाद जिल्ह्यातील काही कारखान्यांची नजरही खानदेशातील कारखान्यांवर आहे. खानदेशात खासगी कारखान्यांची संख्या वाढली आहे. यामुळे ऊस लागवडही वाढत आहे. खानदेशात सुमो २५ हजार हेक्टरवर ऊस आहे. यात सर्वाधिक १२ हजार हेक्टरवर नंदुरबार जिल्ह्यात ऊस आहे. नंदुरबार एक खासगी व दोन सहकारी साखर कारखाने सुरू होतील. शिवाय गुजरातमध्येही तळोदा, शहादामधील काही ऊस उत्पादक आपल्या उसाची विक्री करतात.

शिरपूर (जि.धुळे) तालुक्यातही सावेर येथे खासगी कारखाना सुरू होत आहे. या कारखान्याकडून शिरपूर, चोपडा भागात खरेदी केली जाईल. तसेच चाळीसगाव (जि.जळगाव) मधील भोरस येथेही खासगी कारखाना यंदा जोमात सुरू होणार आहे. चाळीसगाव तालुक्यात  सुमारे साडेचार हजार हेक्टरवर ऊस आहे.

या भागात नगर व नाशिकमधील खासगी कारखानेदेखील उसाची खरेदी करतात. यामुळे उसाची पळवापळवी यंदा होईल.गणपूर (ता.चोपडा) येथे नुकतीच एका खासगी कारखान्याच्या व्यवस्थापनाने शेतकऱ्यांसोबत बैठक घेतली व आपली भूमिका मांडली. 

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com