शेतजमिनीची कर्जे माफ करा; लाभार्थ्यांची मागणी

कुरुंदवाड, जि. कोल्हापूर ः कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेंतर्गत शेतजमिनीसाठी दिलेली कर्जे माफ करावीत, अशी मागणी ३९ लाभार्थ्यांनी राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्याकडे केली.
शेतजमिनीची कर्जे माफ  करा; लाभार्थ्यांची मागणी
Farm Debt Forgiveness Do; Demand of beneficiaries

कुरुंदवाड, जि. कोल्हापूर ः कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेंतर्गत शेतजमिनीसाठी दिलेली कर्जे माफ करावीत, अशी मागणी ३९ लाभार्थ्यांनी राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्याकडे केली. 

महापूर, अतिवृष्टी आणि इतर नैसर्गिक संकटांमध्ये दलित शेतकरी सापडला आहे. उत्पन्नावर परिणाम झाला आहे. लाभार्थ्यांना कर्जाचे हप्ते भरणे कठीण झाले आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या कर्जमाफीच्या परिपत्रकानुसार शिरोळ तालुक्यातील ३९ लाभार्थ्यांना कर्जमाफीमध्ये पात्र करून त्यांना आर्थिक संकटातून मुक्त करावे, असे निवेदनात म्हटले आहे. 

दरम्यान, यड्रावकर यांनी तत्काळ सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना पत्र देऊन सर्व बाबींचा विचार करता या योजनेतील जमिनीच्या कर्जाची संपूर्ण कर्जमाफी देण्याबाबत योग्य ती कार्यवाही व्हावी, अशी विनंती केली आहे.  शासनाने ५० टक्के अनुदान व ५० टक्के बिनव्याजी कर्ज या स्वरूपात निधी देऊन भूमिहीन शेतमजूर कुटुंबांना जमीन वाटप करून दिली. तथापि, काही वर्षांपासून नैसर्गिक आपत्तीने शेतकरी ग्रासला आहे.

शेतीमालाला योग्य भाव मिळत नाही. दिवसेंदिवस खते, औषधे, विजेचे दर, पाणीपट्टी दर वाढतच आहेत. उत्पादन खर्च वाढला आहे. सोसायटी, हातउसणे घेतलेल्या कर्जाचा डोंगर कमी होत नाही. प्रत्येक वर्षी कर्ज वाढत आहे. कर्जाचे हप्ते भरू शकत नाहीत, असे निवेदनात नमूद आहे. दर्शन ठोमके, पुंडलिक ठोमके, सुरेश सावंत, सुरेश कांबळे, विनोद आवळे, दीपाली आवळे, भीमराव मधाळे, जनाबाई आवळे, मोहन गायकवाड आदींच्या सह्या आहेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.