शेतकरी उत्पादक कंपनी ही काळाची गरज : कृषिमंत्री भुसे

नाशिक : ‘‘उत्पादित शेतमाल विक्री करण्यासह त्यावर प्रक्रिया करण्यासाठी शेतकरी उत्पादक कंपनी ही काळाची गरज आहे. यामुळे शेतकरी खऱ्या अर्थाने समृध्द होईल,’’ असा विश्वास कृषिमंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केला.
Farmer producer company is the need of the hour: Agriculture Minister Bhuse
Farmer producer company is the need of the hour: Agriculture Minister Bhuse

नाशिक : ‘‘शेतकरी गट व शेतकरी उत्पादक कंपन्यांमार्फत कृषी विभागाच्या योजना राबविण्यात येतील. 'विकेल ते पिकेल'या संकल्पनेतून शेतकऱ्यांकडून उत्पादित शेतमाल विक्री करण्यासह त्यावर प्रक्रिया करण्यासाठी शेतकरी उत्पादक कंपनी ही काळाची गरज आहे. यामुळे शेतकरी खऱ्या अर्थाने समृध्द होईल,’’ असा विश्वास कृषिमंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केला.

मालेगाव तालुक्यातील खडकी येथे माळमाथा कृषी विकास शेतकरी उत्पादक कंपनीचा प्रारंभ भुसे यांच्या हस्ते नुकताच करण्यात आला. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेंद्र जाधव, उपसभापती सुनील देवरे, पंचायत समिती सदस्य भगवान मालपुरे, विभागीय कृषी सहसंचालक संजीव पडवळ, ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक राजेंद्र निकम, प्रकल्प उपसंचालक हेमंत काळे, शास्त्रज्ञ रामदास पाटील, उपविभागीय कृषी अधिकारी दिलीप देवरे, तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब व्यवहारे, तंत्र अधिकारी गोकूळ अहिरे, पंचायत समिती कृषी अधिकारी किरण शिंदे आदी उपस्थित होते.

भुसे म्हणाले, ‘‘खडकी येथे स्थापन केलेल्या माळमाथा शेतकरी उत्पादक कंपनीचे नाव केवळ गावापुरते मर्यादित न ठेवता त्यात परिसरातील इतरही शेतकऱ्यांना सहभागी करावे. मोठ्या प्रमाणात उत्पादित होणाऱ्या मालावर प्रकिया करण्याबरोबरच रोपवाटिका, बिजोत्पादन सारखे विविध उपक्रम राबवावे. ही कंपनी नावारुपाला आणण्यासाठी कृषी विभागामार्फत सर्वतोपरी मदत  करू.’’  

पडवळ म्हणाले, ‘‘शेतकरी उत्पादक कंपन्यांमध्ये तरुण शेतकऱ्यांचा सहभाग कौतुकास्पद आहे. जिल्ह्यात एकूण २१० नोंदणीकृत कंपन्या आहेत. नव्याने स्थापन होणाऱ्या कंपन्यांना प्रोत्साहन देण्यासाठी तरूणांनी पुढाकार घेऊन महत्वाकांक्षी उपक्रम म्हणून याकडे पहावे. शेतकरी हा कर्जमाफीच्या कुबड्या शिवाय उभा राहण्यासाठी कृषी विभाग प्रयत्नशील आहे. शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या विकास व विस्तारासाठी येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी कृषी विभाग कटिबद्ध आहे.’’ 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com