औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यात शेतकऱ्यांची होतेय खतांसाठी वणवण

जवळपास २५ दिवसांपासून १५ बॅग युरिया व २० बॅग संयुक्त खताच्या मिळाव्या म्हणून प्रयत्न करतोय. पण, खतांचा मेळ काही लागत नाही. पेरणी करून महिना लोटला. पिकांना खत देण्याची वेळ आली आहे. ती चुकते की काय असे वाटते. परिसरातील शेतकऱ्यांची हीच अवस्था आहे. खत हवंय, पण मिळत नाही. - रावसाहेब शिंदे, शेतकरी, नाचनवेल, जि. औरंगाबाद दहा बॅग युरिया हवा असताना पंधरवड्यापूर्वी पाच बॅग कसाबसा मिळाला. आता तर मागितलेले कोणतेच खत मिळत नाही. कुठे कुठे १२ः३२ः१६ उपलब्ध असते. युरियाचा तर विषयच नाही. - रावसाहेब जाधव, शेतकरी, जामखेड, जि.जालना एकत्रित कुटुंबाची मोठी शेती आहे. त्यासाठी खताची तजवीज करताना पेरणीपूर्वी नाकी नऊ आले. पण, डीएपी आणि २०ः२०ः०ः१३ ना आधी मिळाले, ना आता मिळतंय. अजूनही खतांसाठी धडपड सुरूच आहे. - नामदेवराव जगदाळे, शेतकरी, महाजनवाडी, जि. बीड
Farmers in Aurangabad, Jalna and Beed districts are in dire need of fertilizers
Farmers in Aurangabad, Jalna and Beed districts are in dire need of fertilizers

औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड आदी जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना अपेक्षित खते मिळतच नसल्याची स्थिती कायम आहे. वणवण फिरण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.  युरियाचा तुटवडा आहे. खत मिळाले, तर नशीबच उजाडले, अशीच शेतकऱ्यांची भावना आहे. 

औरंगाबादमध्ये कृषिमंत्र्यांनी उचललेल्या पावलामुळे निदान आता तरी शेतकऱ्यांना खते मिळतील, असे वाटत होते. परंतु, अजूनही शेतकऱ्यांना अपेक्षित खते मिळत नसल्याची स्थिती आहे. औरंगाबाद, जालना, बीड या तीनही जिल्ह्यातील बहुतांश भागात शेतकऱ्यांना युरियाचा तुटवडा जाणवत आहे. इतरही अनेक खते मागणीनुसार मिळतच नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. 

पेरणीपूर्वी ही खताची सोय करण्यासाठी प्रचंड धावपळ करावी लागली. आता पहिला, दुसरा खताचा डोस देण्यासाठी खतांची आवश्‍यकता आहे. मात्र, त्यासाठी वणवण फिरण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. त्यामुळे कृषिमंत्र्यांच्या दौऱ्यानंतर यंत्रणेने केलेल्या  खत उपलब्धतेच्या दाव्याचे काय, असा प्रश्न  उपस्थित होत आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com