जळगावात खतांसाठी शेतकऱ्यांची वणवण

जळगाव ः खरीप हंगाम सुरू झाला आहे. पेरणीची लगबगही सुरू आहे. परंतु, हव्या त्या खतांसाठी शेतकऱ्यांना वणवण फिरावे लागत आहे. जिल्ह्यात संयुक्त व काही सरळ खतांचा पुरवठा सुरळीत असला तरी युरियाचा कमी पुरवठा झाला आहे. मे महिन्यात फक्त १० हजार टन युरिया दाखल झाला. ग्रामीण भागात विक्रेते काळाबाजार करीत असून शेतकऱ्यांना आर्थिक झळ बसत आहे.
Farmers' demand for fertilizers in Jalgaon
Farmers' demand for fertilizers in Jalgaon

जळगाव ः खरीप हंगाम सुरू झाला आहे. पेरणीची लगबगही सुरू आहे. परंतु, हव्या त्या खतांसाठी शेतकऱ्यांना वणवण फिरावे लागत आहे. जिल्ह्यात संयुक्त व काही सरळ खतांचा पुरवठा सुरळीत असला तरी युरियाचा कमी पुरवठा झाला आहे. मे महिन्यात फक्त १० हजार टन युरिया दाखल झाला. ग्रामीण भागात विक्रेते काळाबाजार करीत असून शेतकऱ्यांना आर्थिक झळ बसत आहे.

हवे तेवढा युरिया मिळत नाही. २६५-२६६ रुपयांची गोणी ३०० रुपयांना पडत आहे. विक्रेते जादा दर आकारल्याची पावती देत नाहीत. पावतीवर निश्‍चित दरांची नोंद असते. यामुळे शेतकरी तक्रार करू शकत नाहीत. दुसरीकडे काही कंपन्या युरियाचा वितरकांना पुरवठा करताना त्यावर संयुक्त खते घेण्याचे बंधन (लिंकींग) करीत आहेत. यामुळे विक्रेतेदेखील युरियाची जादा दरात किंवा संयुक्त खते घेण्याची संक्ती (लिंकींग) करून विक्री करीत आहेत. पाच गोण्या युरियाच्या हव्या असल्यास त्यासोबत १२०० ते १३५० रुपयांच्या संयुक्त खताची एक गोणी घ्यावी लागते. १० पेक्षा अधिक युरियाच्या गोण्या तर कुणालाही मिळत नसल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली.

जिल्ह्यात सुरवातीला पुरवठादार कंपन्यांची गोदामे व इतर भागात साठवणूक बऱ्यापैकी झाली. नव्या हंगामात अडचण येणार नाही, असा दावा कृषी विभागातील सूत्रांनी केला होता. परंतु, मे महिन्यात पुरवठा रखडत सुरू झाला. आता पेरणी सुरू आहे. युरिया, फॉस्फेटची मागणी आहे.

जिल्ह्यात खरिपासाठी तीन लाख २० हजार मेट्रिक विविध रासायनिक खतांचा कंपन्यांतर्फे पुरवठा होणार आहे. यातील ९५ ते ९८ टक्के खतांचा पुरवठा रेल्वे रॅकच्या माध्यमातून होईल. रेल्वेची मालवाहतूक व्यवस्था मार्च, एप्रिलमध्ये बऱ्यापैकी सुरू असल्याने हा खतपुरवठा सुरळीत झाला आहे. नंतर रेल्वेकडून पुरवठा कमी झाला. रस्त्यांमार्गे रासायनिक खते पोचविण्यासदेखील खत कंपन्यांनी तयारी केली. परंतु हा  पुरवठा परवडणारा नसल्याने अडचणी येत आहेत.

मागील एप्रिल महिन्याच्या सुरवातीलाच युरियाचे दोन रॅक दाखल झाले. याद्वारे सुमारे १२ हजार मेट्रिक टनांपेक्षा अधिक युरिया दाखल झाला. मे महिन्यात तीन कंपन्यांकडून सुमारे १४ हजार मेट्रिक टन युरियाचा पुरवठा झाला. तर, या महिन्यातही दोनदा सुमारे ५४०० मेट्रिक टन युरिया दाखल झाला आहे. युरिया पुरवठ्याची टक्केवारी ५० पर्यंतच आहे, अशी माहिती मिळाली.

युरिया हवा तेवढा मिळत नाही. विक्रेते संयुक्त खत घेण्याची सक्ती करतात. यामुळे उत्पादन खर्च वाढला असून, प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे. - दिलीप पाटील, शेतकरी, चोपडा (जि. जळगाव)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com