जळगाव : पपईची पाच रुपयांनी विक्रीवर शेतकरी ठाम

खानदेशात पपईचा हंगाम अंतिम टप्प्यात आहे. अशातच पपई दराचा तिढा दर महिन्याला गत काळात तयार झाला.
Papaya
Papaya

जळगाव ः खानदेशात पपईचा हंगाम अंतिम टप्प्यात आहे. अशातच पपई दराचा तिढा दर महिन्याला गत काळात तयार झाला. खरेदीदार मनमानी करीत असल्याचा आरोप शेतकरी करीत असून, पुढे किमान पाच रुपये प्रतिकिलोचा दर जागेवरच मिळावा, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.  दरांचा तिढा जळगाव, धुळे, नंदुरबारात सुरुवातीपासून होत आहे. नंदुरबारात जे दर असतात, त्यानुसार जळगाव, धुळ्यात पपईची खरेदी केली जाते. दर अनेक भागात तीन ते चार रुपये प्रतिकिलो असे दिले जात होते. त्यात शेतकऱ्यांनी विरोध केला. याबाबत नुकतीच शहादा (जि. नंदुरबार) येथे शेतकरी व खरेदीदार यांची बैठक झाली. पपईचे दर जागेवर किंवा शिवार खरेदीत किमान पाच रुपये मिळावेत, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली. पपई पीक यंदा अतिपाऊस व कमी दरांमुळे परवडले नाही, असा मुद्दाही उपस्थित करण्यात आला. त्यावर खरेदीदारांनी जसा दर्जा आहे, त्यानुसार दर दिले जातात. सध्या मागणी कमी होत आहे, असे कारण सांगितले. परंतु शेतकऱ्यांनी पाच रुपये प्रतिकिलोचा दर जागेवर मिळाला तर पपईची विक्री करू, असा निर्धार केला. नंतर खरेदीदार, व्यापारीदेखील नरमले. चांगल्या दर्जाच्या पपईचे दर पाच रुपयेच असतील, असे खरेदीदारांनी सांगितले. या बैठकीत शेतकरी घनश्याम चौधरी, सचिन पाटील व इतर मंडळी उपस्थित होती. 

कमी दरात खरेदी खानदेशात शहादा तालुक्यात सर्वाधिक ३८०० हेक्टरवर पपई पीक आहे. यातील अनेक शेतकऱ्यांचे पीक प्रतिकूल वातावरणामुळे खराब झाल्याने ते काढून फेकण्यात आले आहे. पपईची मागणी उत्तरेकडे अधिक असते. थंडी जेवढे दिवस राहील, तेवढी पपईची मागणी राहील. यामुळे आणखी २० ते २५ दिवस पपईचे दर टिकून राहू शकतात. परंतु पपईची कमी दरात खरेदी सर्रास सुरू होती. त्याला शेतकऱ्यांनी विरोध केला, असे सांगण्यात आले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com