सोलापुरात कृषी दिनानिमित्त शेतकऱ्यांचा गौरव 

सोलापुरात कृषी दिनानिमित्त शेतकऱ्यांचा गौरव 
सोलापुरात कृषी दिनानिमित्त शेतकऱ्यांचा गौरव 

सोलापूर ः माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती कृषी दिन म्हणून साजरी करण्यात आली. यानिमित्त जिल्हा परिषदेमध्ये प्रगतिशील शेतकरी आणि उत्कृष्ट काम करणारे अधिकारी यांचा सोमवारी (ता. १) गौरव करण्यात आला. 

कार्यक्रमासाठी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष शिवानंद पाटील, अर्थ व बांधकाम समितीचे सभापती विजयराज डोंगरे, कृषी समितीचे सभापती मल्लिकार्जुन पाटील, सदस्य सचिन देशमुख, रेखा राऊत, शीतलदेवी मोहिते-पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार, जिल्हा कृषी विकास अधिकारी एस. पी. बेंदगुडे, रवींद्र माने, सागर बारवकर, डॉ. लालासाहेब तांबडे, मनोहर मुंडे उपस्थित होते. 

या वेळी कृषी सभापती पाटील यांनी प्रगतिशील शेतकऱ्यांचा आदर्श अन्य शेतकऱ्यांनी घेतला पाहिजे, त्यांचे प्रयोग, अनुभव विचारात घेतले पाहिजेत. कृषी विभाग धडपड्या शेतकऱ्यांना मदतीसाठी सर्वतोपरी तयार आहे. यापुढेही कृषी विभागाच्या वतीने असे विविध उपक्रम राबवले जातील, असे सांगितले. 

उपाध्यक्ष शिवानंद पाटील यांनीही शेतकऱ्यांच्या कामगिरीचे कौतुक केले. शासनाच्या कृषी विभागामार्फत वेगवेगळ्या शासकीय योजना राबविल्या जातात. त्या योजनांचा लाभ शेतकरी घेत असतात. शासकीय योजनांचा लाभ घेऊन प्रगती करणाऱ्या शेतकऱ्यांचा या वेळी गौरव करण्यात आला. तसेच शासकीय योजनांचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्यासाठी अनेक अधिकारी प्रयत्न करत असतात, त्या अधिकाऱ्यांना प्रोत्साहन मिळण्यासाठी चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचाही या वेळी गौरव करण्यात आला.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com