दूध दरातील कापतीने शेतकऱ्यांची परवड 

महिनाभरातच दुधाच्या दरात तब्बल ११ रुपयांची कपात करण्यात आली आहे. त्यामुळे उत्पादन खर्चही निघत नसल्याने दूध उत्पादकांची परवड होत आहे.
milk rearing
milk rearing

औरंगाबाद: महिनाभरातच दुधाच्या दरात तब्बल ११ रुपयांची कपात करण्यात आली आहे. त्यामुळे उत्पादन खर्चही निघत नसल्याने दूध उत्पादकांची परवड होत आहे. त्यामुळे शेतीला पूरक असलेला हा उद्योग बंद करावा का असा प्रश्न उत्पादकांना पडला आहे. 

दुधाचे दर १५ एप्रिल रोजी ३२ रुपये प्रति लिटर होता. तर लॉकडाऊनची घोषणा होताच १६ एप्रिलला २७ रुपये झाला. आणि २१ एप्रिलला २५ रुपयांपर्यंत घसरला. त्यात पुन्हा कपात होत १ मे रोजी २३ रुपये व ११ मे ला २१ रुपये प्रतिलिटर झाला. महिन्यापेक्षा कमी कालावधीतच दरात तब्बल ११ रुपयांची कपात करण्यात आली. त्यातच ५० किलो सरकी पेंड १७०० ते १८०० रुपयांवर पोहचली. त्यामुळे दुधाच्या पैशातून पशुखाद्याची बरोबरी सुद्धा होत नसल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत मोठी वाढ झाल्याचे दिसते आहे  जनावरे विकताही येईना अन् सांभाळताही येईना  लाखगंगा (ता. वैजापूर) येथील दूध उत्पादक राजेंद्र तुरकने म्हणाले, की एकीकडे हिरव्या चाऱ्याचे भाव, सरकी पेंडचे भाव गगनाला भिडले आहेत. तर दुसरीकडे दुधाची परिस्थिती फार वाईट आहे. एक लिटर दुधाला सरासरी १९ ते २० रुपये दर मिळतो. एक गाय आपण सरासरी १५ लिटर दूध जरी धरले तरी त्या दुधाचे पैसे ३०० रुपये रोज होतात. एका गाईला चार किलो सरकी पेंड १४० ते १५० रुपये लागते. हिरवा चारा कमीत कमी शंभर रुपये व कोरडा चारा पन्नास रुपये धरला तर सर्व मिळून तीनशे रुपयाचे खाद्य लागते. आमची मेहनत ही फुकट जाते. आमच्याकडून २० रुपयाने खरेदी करून ४५ रुपयाने विकल्या जाते.    प्रतिक्रिया  दुधाचे भाव पडल्याने आता मोठी पंचायत झाली आहे. जनावरांना लागणारे खाद्य देखील पुरात नाही. दुधाला भाव नसल्याने शेतकरी अडचणी सापडला आहे.  - राजू हारकळ, शेतकरी, परतूर, जि. जालना 

दुधाचे भाव पडल्याने शेतीचा जोडधंदा तोट्यात आला आहे. यातच कांदा जाग्यावर सडला. त्यामुळे दोन्ही बाजूने कोंडी झाली आहे.  - योगेश जईद, शेतकरी, परतूर, जि. जालना   

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com