चारा छावण्यांच्या मुदतवाढीकडे शेतकऱ्यांचे लक्ष

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात अद्यापही दमदार पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा असली, तरी जिल्ह्यातील जनावरांच्या छावण्यांची मुदत ३० जूनपर्यंत सरकारने जाहीर केल्याने छावण्यांना मुदतवाढ कधी आणि किती दिवस मिळणार, याबाबतची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे. कारण, आजही जिल्ह्यात २५२ छावण्यांमध्ये १ लाख ७९ हजार ९६४ जनावरे दाखल आहेत.

गेल्या आठवड्यात पावसाने सुरुवात केली, पण अनेक भागांत त्याने हजेरीच लावली नाही. शिवाय जोरही कमीच राहिला. वास्तविक, पाऊस झाला, तरी जनावरांना चारा उपलब्ध होण्यासाठी तीन-चार महिने लागणार आहेत. त्यामुळे तूर्तास छावण्या बंद करू नये, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. पण सरकारने आधीच घोषणा केल्यानुसार ३० जूनपर्यंत छावण्या सुरू ठेवण्यात येतील, असे जाहीर केले आहे. त्यामुळे सरकारने मुदतवाढ द्यावी, अशी मागणी होत आहे. 

जिल्ह्यातील एकूण छावण्यांपैकी सांगोला तालुक्यातील १३४ छावण्यांमध्ये सर्वाधिक ९६ हजार ९७५ जनावरांचा समावेश आहे. उत्तर सोलापूर तालुक्यात एका छावणीमध्ये ६९७, बार्शी तालुक्यांतील तीन छावण्यांत ३ हजार ३३८, अक्कलकोट तालुक्यातील एका छावणीत ४९१, करमाळा तालुक्यातील १५ छावण्यांत ९ हजार ३०५, माढा तालुक्यातील १७ छावण्यांमध्ये १० हजार २४६, पंढरपूर तालुक्यातील तीन छावण्यांमध्ये १९३६, मोहोळ तालुक्यातील सात छावण्यांमध्ये ५१२०, मंगळवेढा तालुक्यातील ५९ छावण्यांमध्ये ३६ हजार १५९, सांगोला तालुक्यातील १३४ छावण्यांमध्ये ९६ हजार ९७५ तर माळशिरस तालुक्यातील चार छावण्यांमध्ये ५ हजार ५२५ जनावरांचा समावेश आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com