फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांचे २ कोटी ७४ हजार मिळाले

नाशिक परिक्षेत्रातील शेतकऱ्यांची शेतमाल विक्री पश्चात जी फसवणूक होते, त्यास आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासन नाशिक, जळगाव, नंदुरबार, धुळे, अहमदनगर, नाशिक ग्रामीण या जिल्ह्यांत सक्रिय झाले आहे.
pratap dighavkar
pratap dighavkar

नाशिक: नाशिक परिक्षेत्रातील शेतकऱ्यांची शेतमाल विक्री पश्चात जी फसवणूक होते, त्यास आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासन नाशिक, जळगाव, नंदुरबार, धुळे, अहमदनगर, नाशिक ग्रामीण या जिल्ह्यांत सक्रिय झाले आहे. या माध्यमातून फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांना तब्बल २ कोटी ७४ हजार रुपये मिळवून दिले, अशी माहिती नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर यांनी दिली. उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या फसवणुकीसंदर्भात पत्रकारांना माहिती देताना ते बोलत होते. यावेळी जिल्हा अधीक्षक सचिन पाटील उपस्थित होते. यावेळी दिघावकर यांनी सांगितले की, नाशिक विभागात १८ कोटींच्या वर शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक झाली असून यामध्ये साधारण ५ हजार शेतकऱ्यांना फटका बसला. नाशिक विभागात ५९३ तक्रारींची नोंद झाली आहे. यापैकी २ कोटी ७४ लाख रुपये तक्रार करण्यापूर्वी मिळाली असून काही व्यापाऱ्यांनी ३ कोटी ६५ लाख परत देण्याची हमी दिली आहे. शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे अशा संशयित व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यापूर्वी दहा दिवसांची मुदत दिली जाते. त्यानुसार अनेकांना मुदत दिली आहे. त्यास प्रतिसाद मिळत आहे.

दहा एसआयटी पथकांची नेमणूक उत्तर महाराष्ट्रात शेतकरी फसवणुकीच्या घटनेत वाढ झाली आहे. त्यात नाशिक जिल्ह्यात अनेक प्रकरणे आहेत. शेतकरी फसवणुकीचे पैसे मिळविण्यासाठी १० एसआयटी पथके नेमली असून परराज्यातील व्यापाऱ्यांकडून पैसे मिळविण्याचे प्रयत्न पोलीस करणार आहे. तसेच अनेक वकीलही आता शेतकऱ्यांचे मोफत खटले लढवणार आहेत. बाऊन्स धनादेशाचे खटले लढण्यासाठीही वकील पुढे आले आहेत.

जिल्हानिहाय तक्रारी नाशिक:  ५५९ नगर:  २ जळगाव: १७ नंदुरबार:  १३ धुळे :  २

प्रतिक्रिया शेतकऱ्याचे घामाचे पैसे बुडवतील त्यांची गाठ माझ्याशी आहे. कायदेशीर जबाबदारीपेक्षाही नैतिक जबाबदारी मोठी समजून फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांच्या कष्टाचे पैसे वसूल करून देईपर्यंत स्वस्थ बसणार नाही.  -डॉ. प्रतापराव दिघावकर, विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com